Skip to main content

Posts

व्यवहारावर बोलु काही

*सौ .रुपाली राहुल जाधव * *व्यवहारावर बोलु काही * व्यवहार हा शब्द लिहायला ,वाचायला जितका अवघड तितकाच तो जपायला  हि तितकाच अवघड .मुळात तो जोडाक्षर असल्यामुळे बऱ्याच जणांच्या पचनी पडत नाही .आपण आपल्या दैनंदिन जीवनात बरेच व्यवहार करत असतो .त्या पैकी आज आपण सोन्या -चांदीच्या व्यवहारावर बोलू काही .आपल्या भारतात सोने गुंतणुकीला फार महत्व आहे .शास्रात सोने खरेदीचे साडेतीन मुहूर्त ,गुरूपुष्य अमृत योगा च्या खरेदीचे अनन्य साधारण महत्व आहे .*सोन्या -चांदीचा व्यवहार तितक्याच निगुतीनं झाला पाहिजे ,जपला पाहिजे .*  प्रथम ग्राहकाने ठरवायला हवं आपण सोने -चांदी गुंतवणूक म्हणून घेणार  ,हौस म्हणून घेणार कि लग्न कार्यासाठी म्हणून घेणार ? गुंतवणूक म्हणून घ्यायचं तर चोख सोने ,वेढे ,कॅडबरी ,(खाण्याची नाही हं 😀),भिस्कीट स्वरुपात घ्यावी . परंतु आपणास जेव्हा हौस म्हणून दागिने घ्यायचे असतात ते आपण कोणत्या स्वरूपात घ्यायचे ते ठरवून घ्यावे 24कॅरेट मधील पाटल्या ,बांगड्या ,पोहे हार ,डाई पोत ,चैन ,गोफ इ .इ . फॅन्सी दागिने हे शक्यतो 22कॅरेट ,हॉल मार्क पासिंग असणारेच घ्यावे .म्हणजे exchange करणे सोपे होते ...

मेडिक्लेम वर बोलु काही

​ *मेडिक्लेम वर बोलू काही * मेडिक्लेम म्हणजेच आरोग्य विमा हा शब्द आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे .कोरोना काळात बऱ्याच जणांना त्याच्या पासून फायदाही झाला तर काहींना मनस्ताप हि सहन करावा लागला .मेडिक्लेम म्हणजे काय ? तो कोणाकडे करावा ?त्याचे फायदे तोटे कोणते ?ह्या बाबत ची सर्व माहिती तुम्हाला कुठेही मिळेल .एखादा विमा सल्लागार तुम्हाला ती माहीती अगदी हसत मुखाने देईल .मी आज तुम्हाला माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा अनुभव शेअर करणार आहे .त्यावरून तुम्ही वाचक बोध घ्याल हे निश्चित . L.I.C .घ्या किंवा मेडिक्लेम घ्या आपल्या सारखा सामान्य व्यक्ती किंवा मध्यम वर्गी व्यक्ती स्वतःच्या कमाईचा एक हिस्सा त्या साठी राखून ठेवत असतो .माझ्या मैत्रिणीचा पूर्ण अनुभव लिहिला तर रटाळ वाटेल .म्हणून तो न सांगता त्यातुन ती शहाणी नक्कीच झाली .मग तिचेच शहाणपण इथे व्यक्त करते . तर मेडिक्लेम काढतांना तो प्रॉपर कंपनीचाच करावा .star health ,icici lombard ,bajaj सो अँड सो कंपिनचा मेडिक्लेम असतो .तुम्ही कोणत्याही कंपनीचा घ्या पण घेण्या आधी त्यांच्या टर्म्स and कंडिशन्स चा पूर्ण अभ्यास करून घ्या .with cash आहेत कि cash l...

करपत चाललेली माणुसकी

​ *करपत चाललेली  माणुसकी * "अरे माणसा माणसा कधी होशील माणुस "ह्या कवितेच्या ओळी आजही माणसाच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतात .वर्तमान पत्र असो किंव्हा सोशल मीडिया असो माणुसकीला काळिमा फासला जाईल अशी बातमी नाही असा एकही दिवस नाही .    नुकताच दोन दिवसापूर्वी कुणी आपल्या नकोश्या असणाऱ्या मुलीला जिवंत पुरले असा व्हिडीओ होता तीच दैव बलवत्तर म्हणुन ती वाचली .ते पाहिल्यावर वाटलं कोणी आपल्या पोटच्या गोळ्याबरोबर इतकं निर्दयी कृत्य कसे करू शकते ?    दुसरी बातमी एका म्हताऱ्या आईला तिची दोन्ही मुलं अक्षरशः काठीने मारतात .एका आईला एक मुलगा फरपटत घराबाहेर काढतो .हे पाहिल्यावर खरंच काळीज चिरल्यासारख्या वेदना होतात .इतकी माणुसकी करपत चालली आहे का ?एका हत्तीणीचा जीव जातो म्हणुन हळहळणारे आपण ,कोणाच्या छोट्या दुःखानेही दुखी होणारे आपण ,छत्रपती श्री शिवरायांच्या मातीतले आपण मग आपल्याच मातीत अशा घटना घडतात .खुप खुप वेदना होतात .      नुकत्याच आलेल्या महामारीने दाखवून दिल कि *जगण्यासाठी फक्त जगणंच आवश्यक असत * पण त्यातही अनेक घटना अशा होत्या कि ह्या महामारीमुळे रक्ताच...

बापलेकीचं. भावविश्व ,बाप निबंध ,मराठी कविता ,fathers day poem

फादर्स डे निमित्त  बाप लेकीचं भावविश्व्  आमच्या वडिलांना आम्ही काका म्हणत असु अगदी शुन्यातून त्यांनी त्यांचं आयुष्य उभं केलं आम्ही पाच बहिणी एक भाऊ असा मोठा परिवार .  माझ्या आणि काकाश्रींच्या बाबतीत सांगायचे झाले तर काही घटना येथे नमूद करते लहानपणी आम्हा बहिणांना होस्टेलवर शिकण्यासाठी ठेवावं अशी त्यांची खूप इच्छा होती त्या प्रमाणे आम्ही होस्टेल बघूनही आलो पण मला काय दुर्बुद्धी झाली कि मी त्यांना म्हटले कि "काका तुम्हाला आमची लाज वाटते का ?इथे राहील नाही म्हणजे कोणाला कळणार नाही कि तुम्हाला किती मुली आहेत "माझ्या ह्या वाक्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला परत तो विषय कधीच निघाला नाही .    त्यानंतर मला लहानपणी मलेरिया झाल्या मुळे दवाखान्यात ऍडमिट करावे लागले .त्यावेळी त्यांना पहिल्यांदाच हळवे झाल्याचे बघितले ."दणकून खायचं आणि दणकून काम करायचं हि त्यांची शिकवण मी आजही पाळते ".आपल्या घरी आलेल्या याचकाला कधीही विन्मुख जाऊ द्यायचे नाही असा त्याचा वसा होता तो आज आम्ही इमाने इतबारे पाळतो .       मी 12वीत असतांना पहिली कविता केली त्यांना ऐकविली त्यावर त्या...

आस यात्रोत्सवाची : देवमामलेदार श्री यशवंत राव महाराजांचा यात्रोस्तव

आस यात्रोत्सवाची : देवमामलेदार श्री यशवंत राव महाराजांचा यात्रोस्तव  कोरोनाच्या महाभयंकर स्थिती मुळे गेल्या वर्षी देवमामलेदार श्री यशवंत राव महाराजांचा यात्रोस्तव होऊ शकला नाही .खूप चुकल्या सारखं वाटलं .,खंत वाटली पण सर्वांचे हित लक्षात घेता तो निर्णय योग्य होता .पण बा भगवन्ता हि यात्रा म्हणजे नुसती यात्रा नसून अनेकांचे संसार ,उदरनिर्वाह त्या वर अवलंबुन आहेत .  रहाट पाळणे ,खास यात्रे निमित्त असणारे शो ,भांड्यांची दुकाने ,विविध जीवनउपयोगी वस्तुंचे दुकाने ,खेळण्यांची दुकाने ,इ सर्व छोटे छोटे व्यावसायिकांची ती जणु जीवन वाहिनीच .भगवंता कोणे एके काळी आपल्या सामर्थ्यावर आपण बागलाण वासियांसाठी सरकारी खजिना रिता करून दिला तसाच चमत्कार आजच्या कलयुगातही व्हवा अन कोरोनाच संकट टळून यात्रा नेहमीच्या जलोषात भरावी हि मज सारख्या पामराची इच्छा .यात्रेतील फुगा विकणारा नुसता फुगा विकत नसतो तर त्याचा  श्वास तो विकत असतो , यात्रेतील भांडी गल्ली आम्हा स्रियांची पावलं तिथंच जास्त रेंगाळणारी ,खेळण्या -पाळण्यांची गल्ली तरुणाई तिथं जास्त रमणारी ,भाजी आणि खाऊ गल्ली वृद्धांच्या आवडीची अशी एक ना अनेक...

Women Day Poem - तिची उत्तुंग भरारी | Tichi uttung bhrari |जागतिक महिला दिन कविता | 8march womens day | स्त्री च्या भावना |

​ ©️®️सौ .रुपाली जाधव  बागलाण  🖋🖋🖋 *तिची उत्तुंग भरारी * तिची उत्तुंग भरारी फक्त  तिच्याच साठी  इतरांसाठी मात्र ती  केविलवाणी धडपड  सारी  कुटुंबियांसाठी लष्कराच्या भाकरी  भाजण्यासाठी केलेली व्यर्थ धावपळ  तर समाजाला ,नात्यागोत्याला  वाटते हिच्या कडे कसा इतका  रिकामा वेळ ?.... कारण रोजच्या कामाचाच त्यांचा  बसत नाही मेळ .... नोकरदारांना वाटत गृहिणी आहे  ना मग घालवते हि फावला वेळ ... काहींना वाटत काम नाही काही  म्हणुन खेळते भातुकलीचा खेळ ... नाही म्हणायला काही जण देतात  अनाहूत सल्ले ... तब्येतीची  काळजी घे बाई नाही तर  रिकामे करशील नवऱ्याचे गल्ले ... काहींचे सल्ले तर इतके  डोक्यात जातात  सल्ले नको पण तोंड  आवर असे बोलायला लावतात .... पण सगळ्यांचे टोमणे झेलते  मुद्रा ठेऊन हसरी .... कारण घ्यायची असते तिला  उत्तुंग भरारी .... तिची भरारी तिच्या आई वडिलांचरणी  तर गुरु चरणी असते अर्पण .... कारण तिला त्यांनीच शिकविलेले  असते त्याग अन समर्पण ..... नको आहेत कोणाची खोटी स्तुती...

भारावल जाणं | पावनखिंड चित्रपट | Pavankhind Movie |

 *पावनखिंड चित्रपटाच्या निमित्ताने * *भारावल जाणं * *©️®️सौ .रुपाली राहुल जाधव * * बागलाण * फर्स्ट डे फर्स्ट शो काही कारणास्तव शक्य झाला पण लास्ट डे लास्ट शो चुकवला नाही .बाजींची भूमिका करणाऱ्या  अजय पुरकर ह्यांची मुलाखत पहिली ,चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्या पासून त्याच्या रिलीज ची उत्सुकता होती .अप्रतिम संवाद ,कलाकारांनी जीव ओतून केलेले काम ,उत्तम तंत्रज्ञान      ह्यामुळे चित्रपट अगदी मनाला भावतो .*छत्रपतींच्या सिंहासनातील एक एक रत्ना प्रमाण अनमोल रत्न असणारे एक एक मावळे त्यातीलच एक अनमोल रत्न म्हणजे बाजी प्रभु देशपांडे.* त्यांच्या शौऱ्याची गाथा म्हणजे हा चित्रपट .अतिशय उत्तम संवाद .रायाजीच्या तोंडचा संवाद "*जमीन आणि शरीर दोन्हीही कसले नाही तर त्यांचा कस जातो "* ह्यातून व्यायाम ,योग संतुलित आहार ह्याच आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे कळत ."*लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे".* ह्यातून समाजाला उत्तम मार्गदर्शकाची किती गरज आहे हे समजते .खरोखर एक एक वाक्य काळजावर कोरलं जात होत .बांदल प्रमुख दिपाई आणि जिजाऊंच्या हाती तलवार पाहून स्त्री पुरुष समानता त...

निरभ्र आकाश मराठी कविता - सारीपाट शब्दांचा

निरभ्र आकाश मराठी कविता  पाचूच्या डोंगरांवर मानिकांचे बेट सजले  माझ्या साठी कोणी रत्न महालच बांधले  मंद मंद वाऱ्याची झुळूक अंगावर येई  तिच्या सुगंधाने मन माझे प्रफुल्लीत होई  झाडांच्या आडून चित चोर चंद्र चकवा देई  त्या डोंगर वाटेतून घरी पोहचण्याची घाई  निरभ्र आकाश इंद्रधनुष्यासम  सजले  वनाचे सप्तरंगी प्रतिबिंब त्यावर उमटले  मनाच्या गाभाऱ्यातही सप्तरंगी उधळण व्हावी  त्यातून प्रगतीची नवी वाट मज सापडावी  यशाच्या कळसाची मी सोनेरी दोरी व्हावी  शिकवण देणाऱ्या पायथ्याची मज आठवण  रहावी  ह्या सप्तरंगी विचारांनी वन  उजळून निघावे  मृत्यूनंतरही ह्माझ्या विचारांचे स्मरण व्हावे  सौ .रुपाली जाधव  बागलाण Copyrighted by सारीपाट शब्दांचा 2020

बंध नात्याचे - रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!

 बंध नात्याचे   नीता आपल्या भावाला अर्णवला खूपच घाबरून फोन करत होती .चार चारदा खात्री केली कि घरचे देवीच्या दर्शनाला जाणार होते ते गेले का असे .सुदैवानं तिच्या भावाकडे मोबाईल होता पण तिच्या कडे नसल्यामुळे तिने घरच्या लँड लाईन वरून केला .फोन उचल्याण्याचा काही सेकंदाचा वेळी तिला जास्त वाटत होता .    हॅलो अर्णव ,"काय ताई ?बोल ना ;तू इतकी का घाबरली आहे .सर्व ठीक आहे ना ?हो ,हो सर्व ठीक आहे  मी काय सांगते ते नीट लक्ष पूर्वक ऐक .तू नासिकच्या डाँ .निकिता गुंजाळ ह्यांची दोन दिवसां नंतरची अँपॉईंट मेन्ट माझ्या साठी घेऊन ठेव ."का ?कशासाठी ?तू काही वेड वाकड तर करणार नाही ना ?तरीच आई बाबांना फोन न करता मला केलास .तुला माहिती आहे ताई तुझ्या प्रेग्नेंसी च्या बातमीने आई बाबा किती खुश आहे ते ,जीजू ,तुझी सासरची मंडळी कधी नव्हे ती इतकी आनंदी पहिली आणि तुला काय खूळ घुसलं आहे ?     स्टॉप अर्णव अजिबात लेक्चर देऊ नको आणि विसरू नको मी तुझी मोठी ताई आहे ते .तुला आपल्या रक्षा बंधन च्या *रेशीम बंधाची *शप्पथ आहे .तू फक्त अँपॉईनमेंट घेऊन ठेव मी आल...

मैत्री मराठी कविता - Maitri Marathi Kavita - Frendship Poem - Marathi Poetry

मैत्री  मैत्री  माझी मैत्री देवाशी  भक्तीने जोडले मी त्याच्याशी  माझी मैत्री गुरूंशी  आदरे जोडली मी तिच्याशी  माझी मैत्री भजनाशी  स्वरांनी जोडले मी त्यांच्याशी  माझी मैत्री वृक्षांशी  फुलांनी जोडले मी त्यांच्याशी  माझी मैत्री पुस्तकांशी  वाचनाने जोडले मी त्यांच्याशी  माझी मैत्री मातीशी  सुगंधाने जोडले मी तिच्याशी  माझी मैत्री कलेशी  समाधानाने जोडले मी तिच्याशी  माझी मैत्री आई -वडिलांशी  त्यांच्या पायात दिसते मला काशी  माझी मैत्री बहीण -भावंडांशी  सर्व बंधांनी जोडले मी त्यांच्याशी  माझी मैत्री लहान मुलांशी  निरागसपणे जोडली मी त्यांच्याशी  माझी मैत्री पक्वानांशी  चवीने जोडले मी त्यांच्याशी  माझी मैत्री माझ्या पतीशी  साता जन्माचे बंध त्यांच्याशी  माझी मैत्री तुम्हा सर्व मैत्रीणींशी  एका अनामिक ओढीने जोडले मी तुमच्याशी              Copyrighted Gold Poem 2020-...

A Beautiful Poem for Father | Father's Day Special | Heart Touching Poetry| This will make your day

कौन है वह जिसने जिंदगी में एक रिश्ते का मायन बता दिया। गोद में बिठाकर आज भी प्यार से सेलाता है। जब तक ना मिलूं मैं उससे गले उसे चैन कहां आता है? कभी मां का कभी बाप का कभी दोस्त का फर्ज निभाता है। मेरी जिंदगी में यह इकलौता इंसान कई किरदार अदा कर जाता है। वह बाप ही तो है जो इतनी मोहब्बत बरसाता है। यार तुम भी हद करते हो बाप हूं में तुम्हारा। कुछ तो शर्म करो कहकर इस बात को हंसी में उड़ा जाता है। बच्चों की तरह हम से लड़ना फिर खुद कभी बच्चा बनकर हमारी गोद में सोना। कभी हमें सिखाना कभी हमसे सीखना। हल्का सा गुस्सा करके खुद ही उसका मजाक बनाना। हंसी हंसी में जिंदगी के बहुत से सबक सिखाना। इतना बड़ा दिल और ऐसी अदाकारी यार तू कहां से लाता है? यार तू यह उम्र का फर्क कैसे मिटाता है? इतने सारे किरदार एक साथ कैसे निभाता है? -nats Gold Poem Copyright 2020

School ka Pyaar- Hindi- Poetry- Love Poem-Poem on School Love - Gold Poem

स्कूल का पेहला दिन था उसका,वो थोरी घबराई थी सब देख रहे थे उसको,नई थी और दूसरा थोरा लेट जो आई थी  सब दौरे उसका नाम पूछने साथ मेरे भी दो यार जगये थे.... जब देखा था पेहली दफा उसे तभी हम अपना दिल हार गये थे चेहरे से मासूम थू बिल्कुल और बरी सिम्पल नज़र आती थी,जब भी हस्ती थी वो,तो उसकी cute सी डिंपल बन जाती थी.... उसे हसाने को अब मैं खुद का भी मज़्ज़ाक बनाता था,उसे जैसा पसन्द होता मैं बिल्कुल वैसा बन जाता था .... अब जो मैं कभी लेट जाता तो मेरे दोस्त खुद उठकर मुझे उसके साथ बिठाते थे.... यारों को तो छोर हाय दो,मुझे दूसरे भी उसके नाम से चिधाते थे बहुत दिन बीत चुका था अब वो खुद मेरे लिये अपने बगल में जगह बचती थी अब जब भी अचानक देखता उसको तो वो भी मुझे ही देखते नज़र आती थी अब लगता था जैसे मुझे ही नहीं उसे भी मुझ्से प्यार हो रहा था,हर बात बताती वो मुझको,अब शायद मैं उसका दिलदार हो रहा था.... मैनें अब ठान लिया उसे अपनी प्यार जतानी है,कुछ भी हो जाये उसे दिल की बात बतानी है उसे पसंद थी बनावटी चीजें मैंने उसके नाम का लव कार्ड बनाया था .... कुछ गर्बर ना हो जाये ...

Fathers Day Poem In Hindi - पिता दिवस पर कविता 2020 - Father's Day Par Kavita ...

बना  रहा है मेरे लिये पक्के मकान उसका घर अभी भी कच्चा है  माथे पे सिकन काँधे पर पसीना घुटनो में दर्द और फिर भी कहता है सब अच्छा है  माना कभी मुझको गले नहीं लगाता प्यार होकर भी प्यार नहीं जताता याद रखता है तौफे देता है वो अपना जन्मदिन नहीं मनाता मेरी हर जिद हर मर्जी पुरा करता है उसकी ख्वाहिशें क्या है नहीं बताता कोई पुछ ले मेरे काम काज के बारे में तो कहता है वो तो अभी बच्चा है  कमजोर आंखे थरथराते हाथ लड़खड़ाती जुबान और फिर भी कहता है सब अच्छा है  नामुमकिन में मुमकिन ढूंढ लाता है वो अक्सर घर देर आता है जिक्र नहीं करता हालातों को अपनी हमेशा खुद को अमीर बताता है वो बाप है जिन्दगी जीने का तरीका बताता है कभी डांट लगाता है कभी पीठ थप्थपाता है जो बाहर से कुछ और अन्दर से कुछ वो इन्सान कैसे सच्चा है   खाली जेब पुराने कपडे फटे जुते और फिर भी कहता है सब अच्छा है Paresaaniyo ka chehra sukoon ka naqaab  Samajhta khud ko fakeer bete ko nawab  Nind puri nahi hoti subah ghar se nikal jata hai Je...

Father's Day Marathi Kavita | Marathi Poem on Father - Short Poem on Father in Marathi

आमचे वाढदिवस साजरे  करता करता तुमचं वय वाढलं  तुम्हास काय भेट देऊ?  हे विचार करण्यातच डोकं खर्च झाल     महासागरांन प नदीला काय द्यावं ? लाटांमध्ये आपला पाणी मिसळून जावा फ़ांद्यांनी झाडांना काय द्यावे ?  अधिकाधिक फुलवून झाड मजबूत कराव  पूर्ण हो तुमच्या सर्व तुमच्या सर्व मनोकामना  हीच ईश्वरचरणी प्रार्थना

पिता दिवस - फादर्स डे लेक - Father’s Day- Hindi Article- Happy Father Day- Best Wishes- Gold Poem

पिता दिवस पितृ दिवस पितृत्व का सम्मान करने का दिन है, साथ ही साथ समाज में पिता के प्रभाव का भी। यह 1910 में पहली बार जून के तीसरे रविवार को मनाया गया है। यह दुनिया भर के कई हिस्सों में विभिन्न दिनों में भी आयोजित किया जाता है, अक्सर मार्च, मई और जून के महीनों में। पिता के दिन के अलावा, अंतर्राष्ट्रीय पुरुषों का दिवस 19 नवंबर को कई देशों में लड़कों सहित पुरुषों के सम्मान में मनाया जाता है। फेयरमोंट के सेंट्रल मेथोडिस्ट चर्च में वेस्ट वर्जीनिया के डॉ। रॉबर्ट वेब द्वारा 5 जुलाई, 1908 को पहली बार फादर्स डे मनाया गया था। बाद में, श्रीमती सोनोरा स्मार्ट डोड ने 1909 में चर्च में मातृ दिवस के उपदेश को सुनते हुए अपने पिता के लिए एक समान उत्सव मनाने के बारे में सोचा। उसके पिता, हेनरी जैक्सन स्मार्ट, ने उसकी माँ की मृत्यु के बाद उसकी परवरिश की थी। इस दिन लोग अपने पिता के लिए उपहार खरीदते हैं या उनके साथ विशेष चीजों का व्यवहार करते हैं जैसे कि फैंसी रेस्तरां में रात का खाना या विदेश में छुट्टी का प्रायोजन। लोग फादर्स डे पर गुलाब खरीदते हैं, पिता के लिए लाल रंग जो ...

Subscribe Us