बंध नात्याचे नीता आपल्या भावाला अर्णवला खूपच घाबरून फोन करत होती .चार चारदा खात्री केली कि घरचे देवीच्या दर्शनाला जाणार होते ते गेले का असे .सुदैवानं तिच्या भावाकडे मोबाईल होता पण तिच्या कडे नसल्यामुळे तिने घरच्या लँड लाईन वरून केला .फोन उचल्याण्याचा काही सेकंदाचा वेळी तिला जास्त वाटत होता . हॅलो अर्णव ,"काय ताई ?बोल ना ;तू इतकी का घाबरली आहे .सर्व ठीक आहे ना ?हो ,हो सर्व ठीक आहे मी काय सांगते ते नीट लक्ष पूर्वक ऐक .तू नासिकच्या डाँ .निकिता गुंजाळ ह्यांची दोन दिवसां नंतरची अँपॉईंट मेन्ट माझ्या साठी घेऊन ठेव ."का ?कशासाठी ?तू काही वेड वाकड तर करणार नाही ना ?तरीच आई बाबांना फोन न करता मला केलास .तुला माहिती आहे ताई तुझ्या प्रेग्नेंसी च्या बातमीने आई बाबा किती खुश आहे ते ,जीजू ,तुझी सासरची मंडळी कधी नव्हे ती इतकी आनंदी पहिली आणि तुला काय खूळ घुसलं आहे ? स्टॉप अर्णव अजिबात लेक्चर देऊ नको आणि विसरू नको मी तुझी मोठी ताई आहे ते .तुला आपल्या रक्षा बंधन च्या *रेशीम बंधाची *शप्पथ आहे .तू फक्त अँपॉईनमेंट घेऊन ठेव मी आल...