आस यात्रोत्सवाची : देवमामलेदार श्री यशवंत राव महाराजांचा यात्रोस्तव कोरोनाच्या महाभयंकर स्थिती मुळे गेल्या वर्षी देवमामलेदार श्री यशवंत राव महाराजांचा यात्रोस्तव होऊ शकला नाही .खूप चुकल्या सारखं वाटलं .,खंत वाटली पण सर्वांचे हित लक्षात घेता तो निर्णय योग्य होता .पण बा भगवन्ता हि यात्रा म्हणजे नुसती यात्रा नसून अनेकांचे संसार ,उदरनिर्वाह त्या वर अवलंबुन आहेत . रहाट पाळणे ,खास यात्रे निमित्त असणारे शो ,भांड्यांची दुकाने ,विविध जीवनउपयोगी वस्तुंचे दुकाने ,खेळण्यांची दुकाने ,इ सर्व छोटे छोटे व्यावसायिकांची ती जणु जीवन वाहिनीच .भगवंता कोणे एके काळी आपल्या सामर्थ्यावर आपण बागलाण वासियांसाठी सरकारी खजिना रिता करून दिला तसाच चमत्कार आजच्या कलयुगातही व्हवा अन कोरोनाच संकट टळून यात्रा नेहमीच्या जलोषात भरावी हि मज सारख्या पामराची इच्छा .यात्रेतील फुगा विकणारा नुसता फुगा विकत नसतो तर त्याचा श्वास तो विकत असतो , यात्रेतील भांडी गल्ली आम्हा स्रियांची पावलं तिथंच जास्त रेंगाळणारी ,खेळण्या -पाळण्यांची गल्ली तरुणाई तिथं जास्त रमणारी ,भाजी आणि खाऊ गल्ली वृद्धांच्या आवडीची अशी एक ना अनेक...