मैत्री
मैत्री
माझी मैत्री देवाशी
भक्तीने जोडले मी त्याच्याशी
माझी मैत्री गुरूंशी
आदरे जोडली मी तिच्याशी
माझी मैत्री भजनाशी
स्वरांनी जोडले मी त्यांच्याशी
माझी मैत्री वृक्षांशी
फुलांनी जोडले मी त्यांच्याशी
माझी मैत्री पुस्तकांशी
वाचनाने जोडले मी त्यांच्याशी
माझी मैत्री मातीशी
सुगंधाने जोडले मी तिच्याशी
माझी मैत्री कलेशी
समाधानाने जोडले मी तिच्याशी
माझी मैत्री आई -वडिलांशी
त्यांच्या पायात दिसते मला काशी
माझी मैत्री बहीण -भावंडांशी
सर्व बंधांनी जोडले मी त्यांच्याशी
माझी मैत्री लहान मुलांशी
निरागसपणे जोडली मी त्यांच्याशी
माझी मैत्री पक्वानांशी
चवीने जोडले मी त्यांच्याशी
माझी मैत्री माझ्या पतीशी
साता जन्माचे बंध त्यांच्याशी
माझी मैत्री तुम्हा सर्व मैत्रीणींशी
एका अनामिक ओढीने जोडले मी तुमच्याशी

Comments
Post a Comment