*पावनखिंड चित्रपटाच्या निमित्ताने *
*भारावल जाणं *
*©️®️सौ .रुपाली राहुल जाधव *
* बागलाण *
फर्स्ट डे फर्स्ट शो काही कारणास्तव शक्य झाला पण लास्ट डे लास्ट शो चुकवला नाही .बाजींची भूमिका करणाऱ्या अजय पुरकर ह्यांची मुलाखत पहिली ,चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्या पासून त्याच्या रिलीज ची उत्सुकता होती .अप्रतिम संवाद ,कलाकारांनी जीव ओतून केलेले काम ,उत्तम तंत्रज्ञान ह्यामुळे चित्रपट अगदी मनाला भावतो .*छत्रपतींच्या सिंहासनातील एक एक रत्ना प्रमाण अनमोल रत्न असणारे एक एक मावळे त्यातीलच एक अनमोल रत्न म्हणजे बाजी प्रभु देशपांडे.* त्यांच्या शौऱ्याची गाथा म्हणजे हा चित्रपट .अतिशय उत्तम संवाद .रायाजीच्या तोंडचा संवाद "*जमीन आणि शरीर दोन्हीही कसले नाही तर त्यांचा कस जातो "* ह्यातून व्यायाम ,योग संतुलित आहार ह्याच आपल्या आयुष्यात किती महत्व आहे हे कळत ."*लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे".* ह्यातून समाजाला उत्तम मार्गदर्शकाची किती गरज आहे हे समजते .खरोखर एक एक वाक्य काळजावर कोरलं जात होत .बांदल प्रमुख दिपाई आणि जिजाऊंच्या हाती तलवार पाहून स्त्री पुरुष समानता त्याकाळी प्रत्यक्ष कृतीत होती ते समजलं .महाराजांसाठी हसत हसत मरणाला सामोरे जाणारे मावळे पहिले कि स्वतःच्या कोत्या विचारांची लाज वाटते .इतका त्याग समर्पण आपण करू शकू का ?हा प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःला विचारावा वाटतो .टोपीकर इंग्रजांचा कावा राजांनी आधीच हेरला होता .त्यांनी दूरदृष्टीनं आरमार उभं केलं .*खरचं राजं पुन्हा जन्माला या .तुमच्या विचारांची ,आचारांची ,दूरदृष्टीची आज नितांत गरज आहे .* चित्रपटातील दोन्हीही लोकसंगीताच्या बाजावर आधारित गाणी उत्तम ,श्रवणीय आणि ठेका धरायला लावणारी नक्कीच आहे .तसेच मध्ये मध्ये दोन दोन कडवी सादर केली आहे ती भजना प्रमाण भासतात .पुष्पा च्या action अबाल वृद्धांनी रिल्स ,satus ,व्हिडीओ post केले .कोणी ह्या चित्रपटातील गीतांच्याहि रिल्स व्हिडीओ बनवाव्यात .पुष्पा एक चित्रपट म्हणून उत्तम आहे पण एक चंदन तस्कर आपला आदर्श असावा कि ?बाजींसारखा मावळा ,शिवबा आपला आदर्श असावा ?*संस्कार हे काही एका क्लीक वर भावी पिढीत इन्सर्ट करता येत नाही ते आपल्या वाणी ,विचार ,आचारातूनच द्यावे लागतात .* आपला इतिहास किती समृद्ध आहे हे बघण्यासाठी सर्वानी आवर्जुन सिनेमा गृहात जाऊन *"पावनखिंड "* हा चित्रपट बघावा .मनाला निश्चितच समाधान मिळेल .
Comments
Post a Comment