Women Day Poem - तिची उत्तुंग भरारी | Tichi uttung bhrari |जागतिक महिला दिन कविता | 8march womens day | स्त्री च्या भावना |
©️®️सौ .रुपाली जाधव
बागलाण
🖋🖋🖋
*तिची उत्तुंग भरारी *
तिच्याच साठी
इतरांसाठी मात्र ती
केविलवाणी धडपड सारी
कुटुंबियांसाठी लष्कराच्या भाकरी
भाजण्यासाठी केलेली व्यर्थ धावपळ
तर समाजाला ,नात्यागोत्याला
वाटते हिच्या कडे कसा इतका
रिकामा वेळ ?....
कारण रोजच्या कामाचाच त्यांचा
बसत नाही मेळ ....
नोकरदारांना वाटत गृहिणी आहे
ना मग घालवते हि फावला वेळ ...
काहींना वाटत काम नाही काही
म्हणुन खेळते भातुकलीचा खेळ ...
नाही म्हणायला काही जण देतात
अनाहूत सल्ले ...
तब्येतीची काळजी घे बाई नाही तर
रिकामे करशील नवऱ्याचे गल्ले ...
काहींचे सल्ले तर इतके
डोक्यात जातात
सल्ले नको पण तोंड
आवर असे बोलायला लावतात ....
पण सगळ्यांचे टोमणे झेलते
मुद्रा ठेऊन हसरी ....
कारण घ्यायची असते तिला
उत्तुंग भरारी ....
तिची भरारी तिच्या आई वडिलांचरणी
तर गुरु चरणी असते अर्पण ....
कारण तिला त्यांनीच शिकविलेले
असते त्याग अन समर्पण .....
नको आहेत कोणाची खोटी स्तुती
अन त्याच त्याच इमोजींची चोरी ....
तिला स्वतःसाठी ,स्वतःच्या
मानसिक समाधानासाठी घ्यायची
आहे उत्तुंग भरारी .....
सगळ्यांसाठी जगताना ती होते
महान नारी ...
थोडं स्वतःसाठी जगायला सुरुवात
केली तर लगेच नसती थेर सारी ....
म्हणुन नको देवा पुढचा जन्म
स्त्रीचा अशी ती विनवणी
करते देवाच्या दारी ....
असेल बळकट तिच्या भाग्याची दोरी ...
एक दिवस नक्कीच घेईल ती
उत्तुंग भरारी .....
😔😔😔😔😔
Comments
Post a Comment