नुकताच दोन दिवसापूर्वी कुणी आपल्या नकोश्या असणाऱ्या मुलीला जिवंत पुरले असा व्हिडीओ होता तीच दैव बलवत्तर म्हणुन ती वाचली .ते पाहिल्यावर वाटलं कोणी आपल्या पोटच्या गोळ्याबरोबर इतकं निर्दयी कृत्य कसे करू शकते ?
दुसरी बातमी एका म्हताऱ्या आईला तिची दोन्ही मुलं अक्षरशः काठीने मारतात .एका आईला एक मुलगा फरपटत घराबाहेर काढतो .हे पाहिल्यावर खरंच काळीज चिरल्यासारख्या वेदना होतात .इतकी माणुसकी करपत चालली आहे का ?एका हत्तीणीचा जीव जातो म्हणुन हळहळणारे आपण ,कोणाच्या छोट्या दुःखानेही दुखी होणारे आपण ,छत्रपती श्री शिवरायांच्या मातीतले आपण मग आपल्याच मातीत अशा घटना घडतात .खुप खुप वेदना होतात .
नुकत्याच आलेल्या महामारीने दाखवून दिल कि *जगण्यासाठी फक्त जगणंच आवश्यक असत * पण त्यातही अनेक घटना अशा होत्या कि ह्या महामारीमुळे रक्ताची नातीही परकी झाली आपली माणुसकी हरवुन बसली .कुठे तरी वाचलं होत एक आजोबा आपल्या नातूला सांगतात "बाबा रे ,करिअर साठी माणुसकी क्षेत्र निवड सध्या तिथे स्कोप फार आहे "ह्या छोट्याश्या वाक्यातून त्याचा अर्थ स्पष्ट होतो .
कोणी अडचणीत असतांना त्याला मदत करायचे सोडून व्हिडीओ काढत बसायचे ,मुलांना मारताना चे व्हिडीओ ,मागे एक मुलगी मांजराच्या अंगावर पाय देत होती त्याचा व्हिडीओ काय ?काय ?नि कोणते ?कोणते ?खरोखर ह्या सर्व घटनांमधून माणुसकी करपत चालली आहे असेच म्हणावे लागेल .
आजकाल भगवन्ता जवळ आपल्याला एकच प्रार्थना करावी लागते कि "माणसाने माणसाशी माणसां सम वागावे "सन्माननीय बाबा आमटे ,सिंधुताई सपकाळ ,डाँ .अभिजित सोनवणे ,ह्या आणि यांसारख्या बोटावर मोजण्या इतपत लोकांच्या चांगुलपणामुळे माणुसकीच झाड जिवंत आहे .
©️®️🖋🖋🖋
-सौ .रुपाली जाधव
बागलाण

Comments
Post a Comment