Skip to main content

Posts

Showing posts with the label मराठी

बंध नात्याचे - रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!

 बंध नात्याचे   नीता आपल्या भावाला अर्णवला खूपच घाबरून फोन करत होती .चार चारदा खात्री केली कि घरचे देवीच्या दर्शनाला जाणार होते ते गेले का असे .सुदैवानं तिच्या भावाकडे मोबाईल होता पण तिच्या कडे नसल्यामुळे तिने घरच्या लँड लाईन वरून केला .फोन उचल्याण्याचा काही सेकंदाचा वेळी तिला जास्त वाटत होता .    हॅलो अर्णव ,"काय ताई ?बोल ना ;तू इतकी का घाबरली आहे .सर्व ठीक आहे ना ?हो ,हो सर्व ठीक आहे  मी काय सांगते ते नीट लक्ष पूर्वक ऐक .तू नासिकच्या डाँ .निकिता गुंजाळ ह्यांची दोन दिवसां नंतरची अँपॉईंट मेन्ट माझ्या साठी घेऊन ठेव ."का ?कशासाठी ?तू काही वेड वाकड तर करणार नाही ना ?तरीच आई बाबांना फोन न करता मला केलास .तुला माहिती आहे ताई तुझ्या प्रेग्नेंसी च्या बातमीने आई बाबा किती खुश आहे ते ,जीजू ,तुझी सासरची मंडळी कधी नव्हे ती इतकी आनंदी पहिली आणि तुला काय खूळ घुसलं आहे ?     स्टॉप अर्णव अजिबात लेक्चर देऊ नको आणि विसरू नको मी तुझी मोठी ताई आहे ते .तुला आपल्या रक्षा बंधन च्या *रेशीम बंधाची *शप्पथ आहे .तू फक्त अँपॉईनमेंट घेऊन ठेव मी आल...

आतुर्ता रायगडची -हिंदु समराज्य ची स्तपाणाः शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

*आतुर्ता रायगडची* *आतुर्ता रायगडची* ज्या क्षनाची वाट शिवप्रेमी शिवभक्त वर्षभर बघतात त्याच क्षनाला मुकावे लागणार,तो म्हणजे *सुवर्ण क्षन शिवराज्यभिषेक* मन आता पासुणच कासावीस होतय तो धुक्यात पावसात सजलेला रायगड शिवप्रेमीची अफाट गर्दी ढोल ताशांचा आवाच सह्यांद्रीच्या वाऱ्याने फडकणारे पवित्र भगवे ध्वज शिवभक्तानी डोक्या वरती घातलेले भगवे फेटे,दिव्यांच्या प्रकाशात फुलानी सजलेल श्री शिर्काई देवीचे मंदिर,होळीच्या माळा वरील मर्दानी खेळ शिवभक्तांची गर्दी,शिवभक्तानी गजबजलेली बाजारपेठ,टकमक टोका वरती येणाऱ्या नवख्खा आणि फोटो शुट प्रेमींची गर्दी,नगार खाण्या समोर पवित्र भगवे ध्वज नंग्या नाचत्या तलवारी,नगारखाना ते राजसदर शिवकन्या मुलिनी काढलेली रांगोळी,राजसदरेत छत्रपती शिवशंभू मर्द मावळ्याच्या वरती होणारे मंत्रमुग्ध व्याख्याने,शाहिरांचे पोवाडे,गडा वरती इतिहास प्रेमींची गड न्याहळतांनाची आवड,गोदंळ्याच्या सोबत दिवट्या घेऊण भुते बणुन नाचणारे शिवभक्तानी आई तुळजा भवानीला घातलेला गोंदळ,३ दिवस गडा वरती येऊण अपल्या राजाचा शिवराज्यभिषेक सोहळा नेत्रदिपक तेजस्वी आंनदात व्ह...

हिंदू सम्राज्य दिन: शिवाजी महाराजांचा इतिहास - हिंदु समराज्य ची स्तपाणाः शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

हिंदू सम्राज्य दिन: शिवाजी महाराजांचा इतिहास - हिंदु समराज्य ची स्तपाणाः शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदू सम्राज्य दिन: शिवाजी महाराजांचा इतिहास - हिंदु समराज्य ची स्तपाणाः शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त 4 जून हा हिंदू सम्राज्य दिवस म्हणून साजरा केला जातो. असा विश्वास आहे की हिंदू राज्य शिवाजी राज्याभिषेकाने अस्तित्वात आले. छत्रपती शिवाजी मराठा साम्राज्याची स्थापना करणारे 17 व्या शतकातील राज्यकर्ता होते. हा दिवस महाराष्ट्रात ‘शिव राज्यत्व महोत्सव’ म्हणूनही साजरा केला जातो. शिवाजी महाराजांचे शौर्य अजूनही प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहे आणि त्यांचे किस्से अजूनही मुलांपर्यंत भाष्य करतात. पाच हजार फूट उंचीवर असलेल्या महाराष्ट्राच्या रायगड किल्ल्यावर एका भव्य सोहळ्यात मराठा राजाचा राज्याभिषेक झाला. रायगडमधील लोक 4 जून रोजी येणार्‍या हिंदु महिन्यात जयेश्थ शुक्ल त्रयोदशी (13 व्या दिवशी) दिवस साजरा करतात. इतिहासानुसार शिवाजी महाराजांनी केवळ किशोरवयीन असतानाच हिंदव स्वराज्य स्थापण्याची शपथ घेत...

फादर्स डे - मराठी लेक - Father’s Day- Marathi Article- Happy Father Day- Best Wishes- Gold Poem

फादर्स डे फादर्स डे हा एक उत्सव आहे जो वडिलांचा आणि पूर्वजांच्या भूमिकेचा सन्मान करतो . ही एक आधुनिक सुट्टी आहे , जरी प्राचीन रोमन लोकांमध्ये प्रत्येक फेब्रुवारीमध्ये वडिलांचा सन्मान करण्याची परंपरा होती , परंतु केवळ मरण पावलेल्यांनाच . जगभरात फादर्स डे वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो , जरी हा दिवस समान रीतीने साजरा केला जातो , ज्यामध्ये सहसा वडिलांना आणि कौटुंबिक क्रियाकलापांना भेटवस्तू दिली जाते . फादर्स डेसाठी सर्वात लोकप्रिय तारीख जूनमधील तिसरा रविवार आहे . ही तारीख सर्वप्रथम यूएसएमध्ये पाळली गेली आणि त्यानंतर अनेक देशांनी ती स्वीकारली . स्पेन , इटली आणि पोर्तुगालमध्ये १ March मार्च रोजी फादर्स डे साजरा केला जातो , जो सेंट जोसेफचा पर्व आहे जो वडिलांचा संरक्षक संत आहे . जर्मनीमध्ये फादर डे हा त्याच दिवशी तारखेचा दिवस म्हणून साजरा केला जातो . संपूर्ण स्कॅन्डिनेव्हियामध्ये , फादर्स डेची परंपरा 1930 च्या दशकात स्वीकारली गेली . मूलतः अमेरिकन तारीख वापरली ज...

बाळा तुझे नाव नाही सांगितलेस"? - विनायक दामोदर सावरकर"!!! - मराठी लेक

बाळा तुझे नाव नाही सांगितलेस"? टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते. कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!" त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!" लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची! अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा...

चहाची विविध रूप- मराठी कविता - चहा मराठी कविता - Marathi Kavita on Tea - Chai Marathi Poetry

चहाची विविध रूप चहाच आणि माझं नातं अगदी जवळच  जिवाभावाच्या मैत्रिणीचं       लहानपणापासुन दुधापेक्षा      आवडीचा म्हणजे चहा        कधी कधी कॉफीही घेतली जायची     पण मी मात्र चहाच्याच तंद्रीत असायची  पावसाळ्यतला आल्याचा चहा  हिवाळातल्या गवती चहा  उन्हाळ्यातला सवयीचा भाग झालेला चहा  आजारपणातला घेतलेला  काढा वजा चहा  हरिमंदिरातला अमृततुल्य चहा  कुणाकडचा पाहुणचाराचा चहा मी कधी नको असताना मिळालेला चहा  कधी खुप गरज असताना न मिळालेला चहा  काकाश्रींच्या आठवणीत वर्षभरासाठी सोडलेला चहा        अशी चहाची अनेक विविध रूप         मनाच्या एका कप्यात साचलेली         अनामिक हुरहूर निर्माण करणारी         आज  शब्दबद्ध झाली  कुणी त्याला विष म्हणो  कुणी इंग्रजांनी आणलेलं पेय म्हणो  पण चहाशी असणार  आपलं नातं कुणी नाकारू...

कोरोना पडसाद - corona - marathi kavita- poem on corona virus - marthi poem on lockdown corona virus - lockdown indian - Government -Gold Poem

कोरोना पडसाद कोरोना पडसाद ह्या ह्या कोरोनाने तुला काय दिल ?नि मला काय दिल ? निसर्गाने मानवाची लायकी दाखवून दिली आणि आपल्या अस्तित्वाची दखल दाखवून दिली     जीवनावश्यक गरजा फार थोड्या    आहेत बाकी सर्व आपले चोचले    आहेत ह्याची जाणीव करून दिली ह्या ह्या कोरोनाने तुला काय दिल ?नि मला काय दिल ? आपल्या राज्यात इतके परप्रांतीय आहेत ह्याची माहिती करून दिली त्यात आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची कुवत समजून दिली फेरीवाले ,बाजार ,यात्रा करणारे किती हातावरच जीवन जगतात ;त्यांना हातावरच जेवायची वेळ आणली ज्या मोठया लोकांना कोणत्याही संधीच सोन करायची सवय होती ती त्यांनी करून घेतली    आणि म्हणूनच गरीब -श्रीमंतांची     दरी हि अजूनच वाढली ह्या ह्या कोरोनान तुला काय दिल ?नि मला काय दिल ? गरिबांना सरकारनं तारलं श्रीमंतांनी स्वतःलाच तारलं मध्यम वर्गींयांनी नेहमीप्रमाणे स्वतःच्या इच्छानाच मारलं    कोणी रुळावर चिरडलं गेलं    तर कुणी अपघातात गेलं   ...

कोरोना इफेक्ट - मराठी कविता - लोखड़ौन कविता - Corona Effect - Marathi Kavita - Gold Poem

कोरोना इफेक्ट  सखींनो तुमचं मला  माहिती नाही  पण मी खूप मिस करते आहे ....     आपलं ते एकत्र येणं      अनेक सामाजिक ,धार्मिक       कार्यक्रमानिमीत्त भेटणं  आपली ती किटी पार्टी  आपलं ते हसणं ,बोलणं  एकमेकांच्या सुख -दुःखात  सहभागी होणं     सखींनो तुमचं मला     माहिती नाही    पण मी खूप मिस करते आहे ... ती देवी मंदिरातील  आरतीचा नाद  ती बालोपासेनची  भगवंताला घातलेली साद      शाळकरी मुलांचा      चिवचिवाट      अन बाजारपेठांमधील     झगमगाट  सखींनो तुमचं मला  माहिती नाही  पण मी खूप मिस करते आहे ...     ती आपली वैचारिक बैठक      ती आपली साहित्यिक चर्चा      कार्यक्रमांची मैफिल अन       ज्ञानाची चर्चा    ती लग्नाची पंगत  सणांची रंगत  ती पेठेती...

भाकरीचा चंद्र - मराठी लेक - कोरोना वायरस लोखड़ौन - भारत का मज़दूर - कविता Labour Returning To Home Article Poem

भाकरीचा चंद्र  भाकरीचा चंद्र शोधण्या साठी तू मैलोन्मैल चालू लागला .आपलं बिऱ्हाड पाठीवर घेऊन काटेरी वाट तुडवू राहिला .खरंच आज मजुरांचे त्यांच्या गावी परतणारे लोंढे पहिले तर हि सर्व हातावर पोट घेऊन जगणारी मंडळी .रोजचं आणून खाणारी सामान्य जनता .     आज सहज आठवून पाहिलं बांधकाम व्यवसायात प्लम्बिंग ,फरशी ,प्लास्टर ,पियुपी ,रेलिंग ह्यांसारखे अनेक छोटे मोठे काम करणारे हे मजूर ,हॉटेल व्यवसायाचे मजूर ,मिठाई ,फरसाण वाले कारागीर ,भेळ ,पाणीपुरीच्या गाडी वाले ,फर्निचर करणारे ,रंग कारागीर असे एक ना अनेक ह्या सर्वांवर आपण किती अवलंबुन आपल्या बाजार पेठा किती अवलंबून ?       हा हातावरचा मजूर वर्ग आज आपल्या गावी मिळेल त्या साधनाने ,प्रसंगी जीवावर उदार होऊन जायला तयार आहे .रोज वर्तमानपत्र उघडले कि एक तरी बातमी ह्या कष्ट करणाऱ्याचा अपघाताची असते .कुठे ट्रकला अपघात ,तर कुठे बसला अपघात .      ह्या सगळ्या अपघातात भीषण अपघात रुळावर झोपलेल्या मजुरांचा होता .काय विदारक दृश्य होते ते कोणती स्वप्न घेऊन झोपले असतील आणि काय घडले सकाळी ?ह्या सर्वांचे असे ...

जेंव्हा काय हवे मला अस कोणी विचारेल... मराठी कविता - love marathi poetry

जेंव्हा काय हवे मला अस कोणी विचारेल... तुझी सतत झलक, तुझ्या साथीची ग लगबग, तुझ्या अंगाची महक, बस हेच हवे मला बघ! तुझ्या केसांची चादर, तुझ्या चुनरीचा तो रंग, तुझी स्पर्शती लहर, बस हेच हवे मला बघ! तुझी माझ्याकडे धाव, तुझ्या मिठीतली ती धग, तुझ्या ओठांची चव, बस हेच हवे मला बघ! पावसात तुझी साथ, चिंब माझं जग। सोबत चहा चा घोट, बस हेच हवे मला बघ! बस हेच हवे मला बघ!! — Premachya Charoli  Gold Poem 

एक विनंती वजा पत्र - एक व्यापारी - मायबाप सरकार - मोदी सरकार. - कोरोना - लोखड़ौन - Covid19 Part 2

एक विनंती वजा पत्र - एक व्यापारी - मायबाप  सरकार - मोदी सरकार आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत  एक व्यापारी  सौ .रुपाली राहुल जाधव  बागलाण ©️®️ मायबाप सरकार     पुन्नच एकदा कळकळीची विनंती वजा पत्र      आपल्याला जर कोरोना बरोबरच जगायचे आहे तर हे लॉक डाऊनचे नाटक कशाला ?तब्बल 2महिने घरात .सुरवातीचा काळ आम्ही आनंदाने उपभोगला ,पण आता भीती वाटते आहे .    "आत्मनिर्भर "उच्चारायला जड ,कानांना चांगला वाटला .पण माझ्या सारख्या पामराच्या पार डोक्यावरून गेला ."आत्मनिर्भर "होण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं ह्याचा खुलासा झाला असता तर बरे वाटले असते .     आजही आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे नाहीच मिळाली .खूप गर्दीच्या ठिकाणा बाबत आम्ही समजू शकतो पण आमच्या सारख्या मध्यम व्यापाऱ्यांच काय ? तर "आत्मनिर्भर "होऊन तुमचं तुम्ही पाहून घ्या असा अर्थ आम्ही काढायचा का ?     शाळा ,कॉलेज ,कलासेस च्या ऑनलाईन शिकवणी बाबत तर न बोललेच बरं .फक्त एक फार्स तयार होतो आम्ही ऑनलाईन शिकवतो आहे ,आमची मुलं ऑनलाईन शिकत आहे ....

माणुसकी मराठी कविता - Marathi Manuksi Kavita - Humanity Poem In Marathi - Gold Poem

अष्टाक्षरी  विषय -माणुसकी  माणुसकी शिकण्यास  शाळेत प्रवेश घ्यावा  माणुसकीच्या पाठांचा  मीच कित्ता गिरवावा       कोणी म्हणे खुप वाव        माणुसकीच्या प्रगतीला        इथे नाही स्पर्धा कोण्या        दुसऱ्याशी घडण्याला  माणसाच्या हृदयात  धबधबा वाहु द्यावा  माणुसकीचा अखंड  सर्वांना जीव लावावा       निर्सगाच्या प्रलयात        माणुसकी बहरली       एकमेकांना मदत      करण्यासरसावली  दुखवल नाही मन  कोणाचं तरी जपली  माणुसकी समजावे  हीच संस्कृती आपली   -सौ .रुपाली जाधव  बागलाण Copyright © Gold Poem

संभाजी राजे - संभाजी महाराज कविता - संभाजी महाराज मराठी कविता -Sambhaji Maharaj Kavita in Marathi shivbacha bal -sambhaji raje

विषय -संभाजी राजे  शीषर्क -शिवबाचा बाळ  लाडका बाळ शिवबाचा  अन सईचा  पोरका झाला असतांना  दोन वर्षाचा     स्वराज्याची धुरा सांभाळली     यवनांची दाणादाण उडविली        एका हाती तलवार घेतली    दुसऱ्या हाती लेखणी पेलली  बुधबुधभूषण राजनीती ग्रंथ लिहिला  तरंगता तोफखाना तयार केला         सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात        हा शूर योद्धा खेळला       एकही लढाई न हरण्याचा       मान मिळवला  दृष्ट यवनांच्या तावडीत सापडला  स्वराज्यासाठी बलिदान देता झाला     घरच्या फितुरीमुळे सिंहाचा      छावा जेरबंद झाला     त्याच्या जाण्याने अवघा      सह्याद्री पोरका झाला  -सौ .रुपाली जाधव  बागलाण Copyright © Gold Poem 

संभाजी महाराज कविता - संभाजी महाराज मराठी कविता - Sambhaji Maharaj Kavita in Marathi - Vichar - Lek -Quotes -Gold Poem

शीर्षक-शिवबाचा छावा फाल्गुन वद्य मास हस्त नक्षत्रावर छावा जन्मला पुरंदर किल्ल्यावर स्वराज्याचा वारस शत्रूंचा कर्दनकाळ सईबाईंच्या पदरी असा जन्मला बाळ स्वराज्याला पुत्र झाला खलिता धाडला चोहीकडे बाळाचे मोहकरुप पाहताच काळीज धडधडे सईबाईंनी मनावर घेऊनी घडवला छावा शिवबाचा संभाजी राजे नामाभिधान राजा हा रयतेचा त्रिवार नमन अमुचे या शिवबाच्या छाव्यास जन्मदिनी सुमनांजली वाहते शब्द गुंफूनी काव्यात सौ हेमलता विसपुते वाशिम Copyright © Gold Poem

Subscribe Us