*मेडिक्लेम वर बोलू काही *
मेडिक्लेम म्हणजेच आरोग्य विमा हा शब्द आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे .कोरोना काळात बऱ्याच जणांना त्याच्या पासून फायदाही झाला तर काहींना मनस्ताप हि सहन करावा लागला .मेडिक्लेम म्हणजे काय ? तो कोणाकडे करावा ?त्याचे फायदे तोटे कोणते ?ह्या बाबत ची सर्व माहिती तुम्हाला कुठेही मिळेल .एखादा विमा सल्लागार तुम्हाला ती माहीती अगदी हसत मुखाने देईल .मी आज तुम्हाला माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा अनुभव शेअर करणार आहे .त्यावरून तुम्ही वाचक बोध घ्याल हे निश्चित .
L.I.C .घ्या किंवा मेडिक्लेम घ्या आपल्या सारखा सामान्य व्यक्ती किंवा मध्यम वर्गी व्यक्ती स्वतःच्या कमाईचा एक हिस्सा त्या साठी राखून ठेवत असतो .माझ्या मैत्रिणीचा पूर्ण अनुभव लिहिला तर रटाळ वाटेल .म्हणून तो न सांगता त्यातुन ती शहाणी नक्कीच झाली .मग तिचेच शहाणपण इथे व्यक्त करते .
तर मेडिक्लेम काढतांना तो प्रॉपर कंपनीचाच करावा .star health ,icici lombard ,bajaj सो अँड सो कंपिनचा मेडिक्लेम असतो .तुम्ही कोणत्याही कंपनीचा घ्या पण घेण्या आधी त्यांच्या टर्म्स and कंडिशन्स चा पूर्ण अभ्यास करून घ्या .with cash आहेत कि cash less आहे .हि माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे .आपल्या मेडिक्लेम बाबत आपल्या घरातील सदस्यांना माहिती हवी .सर्वात महत्वाचं म्हणजे इतर पॉलिसी कोणामार्फत हि घेतली तरी चालेल परंतु मेडिक्लेम घेताना एजंटची भुमिका फार महत्वाची असते .मेडिक्लेम आपण घेतोच कशासाठी ?आपल्या आरोग्याबाबत अचानक उदभवलेल्या खर्चाशी सामना करण्यासाठीच ना ? पण कधी कधी हाच मेडिक्लेम आपल्या आरोग्याला हानी पोहचवू शकतो .केवळ आपण त्यातील पुर्ण ज्ञान घेतले नसल्यामुळे होऊ शकतो .एखाद्या वाहनाच्या अपघाताचा क्लेम जितक्या तत्परतेने मंजुर होतो तितक्या तत्परतेने एखादया व्यक्तीचा क्लेम मंजुर होत नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे .बऱ्याच पॉलिसी धारकांचा अनुभव आहे हा .पॉलिसी काढताना जितकी घाई दाखवली जाते तितकी तत्परता पुढे पर्यंत रहावी अशी आम्हा पामरांची अपेक्षा आहे .
मेडिक्लेम मध्ये बऱ्याच आजारांबाबत कव्हर मिळत नाही .टॉन्सिल ,हर्निया ,अस्थमा ,डोळ्यांचे दातांचे विकार ह्यासारखे आजार कव्हर होत नाही .आपल्याला काही आधीचे आजार असतील तर तेही कव्हर होत नाही .त्या बाबत पण संपूर्ण माहिती घ्यावी .दरवर्षी मेडिक्लेमचे प्रिमिअम वाढत जातात .त्याची जाणीव असावी .सर्वात शेवटी आणि अत्यंत महत्वाचं प्रश्न ,आपल्याला गरजच नाही लागली तर ? देवाचे आभार मानावे कि भगवंताने आपल्यावर ती वेळच आणली नाही .पूर्ण माहिती घेतल्या शिवाय कुठल्याही मेडिक्लेम पॉलिसी वर मंजुरी द्यायची नाही .
एखाद्या कंपनीचा मेडिक्लेम आपल्याला पटला नाही तर तो इतर कंपनीत आपण तो port करू शकतो .फक्त त्या बाबत संबंधित एजन्टची भूमिका फार महत्वाची असते .तो जणूनदेवदूताचं काम करत असतो .after all आपल्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक हि त्यांच्या मार्फत केलेली असते .
वाचकहो ,मी कोणी विमा एजन्ट नाही कि मेडिक्लेम एजंट नाही .परंतु एक मैत्रीण ह्या नात्याने एका मैत्रिणीला नुकत्याच आलेल्या अनुभवातून हा लेख. प्रपंच .काय आहे ना .....
"*काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली कधीही चांगले ."*
तसेच * पुढच्यास ठेच मागचा शहाणा * ह्या मराठीतील म्हणी अशाच काही अनुभवातून तयार झाल्या असतील
©️®️सौ .रुपाली जाधव.
बागलाण .
उपयोगी येणारी माहिती आहे, नेहमीच नाण्याची वरची बाजू बघून माणूस निर्णय घेऊन टाककतो, पण दुसऱ्याही बाजूने विचार करावा तेव्हा कुठं त्याचा मोलभाव व्यवस्थित होतो....👍
ReplyDelete