बंध नात्याचे
नीता आपल्या भावाला अर्णवला खूपच घाबरून फोन करत होती .चार चारदा खात्री केली कि घरचे देवीच्या दर्शनाला जाणार होते ते गेले का असे .सुदैवानं तिच्या भावाकडे मोबाईल होता पण तिच्या कडे नसल्यामुळे तिने घरच्या लँड लाईन वरून केला .फोन उचल्याण्याचा काही सेकंदाचा वेळी तिला जास्त वाटत होता .
हॅलो अर्णव ,"काय ताई ?बोल ना ;तू इतकी का घाबरली आहे .सर्व ठीक आहे ना ?हो ,हो सर्व ठीक आहे
मी काय सांगते ते नीट लक्ष पूर्वक ऐक .तू नासिकच्या डाँ .निकिता गुंजाळ ह्यांची दोन दिवसां नंतरची अँपॉईंट मेन्ट माझ्या साठी घेऊन ठेव ."का ?कशासाठी ?तू काही वेड वाकड तर करणार नाही ना ?तरीच आई बाबांना फोन न करता मला केलास .तुला माहिती आहे ताई तुझ्या प्रेग्नेंसी च्या बातमीने आई बाबा किती खुश आहे ते ,जीजू ,तुझी सासरची मंडळी कधी नव्हे ती इतकी आनंदी पहिली आणि तुला काय खूळ घुसलं आहे ?
स्टॉप अर्णव अजिबात लेक्चर देऊ नको आणि विसरू नको मी तुझी मोठी ताई आहे ते .तुला आपल्या रक्षा बंधन च्या *रेशीम बंधाची *शप्पथ आहे .तू फक्त अँपॉईनमेंट घेऊन ठेव मी आली कि आपण दोघे दवाखान्यात जाऊ .
तिथे तुला सर्व कळेल .चल ठेवते फोन
प्रचंड घालमेलीत नीता चे आणि इकडे अर्णवचं दोन दिवस गेले .कशी बशी नीताने सासूबाईंकडून दोन दिवस माहेरी जायची परवानगी घेतली .अर्णव तिला न्यायला आला होता .आधी माहेरी न नेता सरळ तिला घेऊन तो डाँ .गुंजाळा कडे आला .त्याच्या चेहऱ्यावर आपल्या ताई विषयी प्रचंड नाराजी दिसत होती .
त्यांचा न पुकारल्यावर ती दोघे आत गेली .नीताने बोलायला सुरुवात केली डाँ .मला सोनोग्राफी करायची आहे .डाँ .चेहऱ्यावर तोच प्रश्न पण का ?डाँ .शिक्षण चालू असतांनाच चांगलं स्थळ आलं म्हणून आई वडिलांनी माझं लग्न लावून दिल .त्यात हि प्रेग्नेंसी लगेच .तेही मी आनंदाने स्वीकारेल हो पण माझ्या घरात एक अपंग दीर आहे गेल्या 24 वर्षांपासून एकाच जागी असणारे .त्या मुक्या जीवाला बोलता येत नसले तरी त्याचेहोणारे प्रचंड हाल मी गेल्या दीड वर्षांपासून बघते आहे .माझ्या सासूबाई एका अनामिक दडपणाखाली सतत असतात हे मी पाहिलं आहे .माझे आई -वडील जुन्या विचारांचे आहेत .माझ्या निर्णयात ते कितपत साथ देतील माहिती नाही .मला सोनोग्राफी करून बाळ सुदृढ आहे कि नाही इतकीच खात्री करायची आहे .मग ते काहीही असो .
पुन्हा एखाद्या अपंग जीवाला सांभाळायची माझी आज तरी तयारी नाही .इतके बोलून ती जोर जोरात रडू लागली .अर्णव आपल्या ताई कडे बघू लागला .माझ्या पेक्षा 2च वर्षांनी मोठी असणारी ताई आज किती मोठी झाली .त्याच्याही डोळ्यात अश्रू आले .त्याने आपल्या ताईला धीर दिला .त्या नंतर डाँ .सोनोग्राफी केली .
4तासांनी रिपोर्ट मिळणार होते ते 4तास त्यांना 4युगासारखे वाटले .
डाँ .नी त्यांना आत बोलावून सांगितले .तुम्ही निश्चिंत रहा ,काळजी करू नका होणारे बाळ अगदी निरोगी आणि सुदृढ आहे .ते ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला आज एक भाऊ आपल्या रेशीमबंधाला जागला होता .इकडे आई विचार करत होती नेहमी दोन तासात येणारी नीता आज सहा तास होऊन गेले तरी आली नाही ते ."अग आई गाडीचे टायर पंचर झाले होते ,थोडे काम निघाले म्हणून वेळ लागला आम्हाला यायला ."
नीताही आपल्या छोट्या भावाच्या हजरजबाबी पणामुळे आनंदून गेली .
-सौ .रुपाली जाधव
बागलाण


Comments
Post a Comment