*🖋️🖋️🖋️ सौ .रुपाली राहुल जाधव ,बागलाण *एक राम भक्त ,सरस्वती उपासक* *श्रीमद रामायण* अदभुत ,अतुलनीय ,अवर्णनीय ,अविस्मरणीय ,अतिशय सुंदर अशी कलाकृती म्हणजे सोनी टिव्ही वर सध्या प्रसारित होणारे महाकाव्य श्रीमद रामायण .2024हे वर्ष खरोखर रामयुग सुरु झाल्या सारखं वाटलं .अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आणि अवघी धरा राममय झाली .त्यात हि मालिका खरोखर तिचे प्रोमोज बघून ती प्रत्यक्षात कधी बघता येईल ह्याची उत्सुकता ,उत्कंठता तर होतीच . स्वस्तिक production ने जन -सामान्यांच्या मनामनात असणारे महाकाव्य छोटया पडद्यावर आणायला प्रचंड मेहनत घेतली आहे .कलाकारांची योग्य निवड ,वेशभूषा ,सेट ,गायन ,वादन ,संगीत ,संवाद सगळं कसं एका पेक्षा एक सरस .तस बघायला गेलं तर छोट्या पडद्यावर रामायण बघण्याची माझी हि 3री वेळ .रामायण चे पूर्ण कथानक माहिती असून पुढे काय घडेल ?ह्या पेक्षा घडलेलं आपल्या समोर कसे येईल या बाबत उत्कंठता जास्त होती . ह्यातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे .ह्यातील एकही पात्र खोटं वाटत नाही .किंवा खलनायकही वाटत नाही .प्रत्येक घटनेची कारणं अगदी बारीक सारीक तपशीला सह ...