चहाची विविध रूप चहाच आणि माझं नातं अगदी जवळच जिवाभावाच्या मैत्रिणीचं लहानपणापासुन दुधापेक्षा आवडीचा म्हणजे चहा कधी कधी कॉफीही घेतली जायची पण मी मात्र चहाच्याच तंद्रीत असायची पावसाळ्यतला आल्याचा चहा हिवाळातल्या गवती चहा उन्हाळ्यातला सवयीचा भाग झालेला चहा आजारपणातला घेतलेला काढा वजा चहा हरिमंदिरातला अमृततुल्य चहा कुणाकडचा पाहुणचाराचा चहा मी कधी नको असताना मिळालेला चहा कधी खुप गरज असताना न मिळालेला चहा काकाश्रींच्या आठवणीत वर्षभरासाठी सोडलेला चहा अशी चहाची अनेक विविध रूप मनाच्या एका कप्यात साचलेली अनामिक हुरहूर निर्माण करणारी आज शब्दबद्ध झाली कुणी त्याला विष म्हणो कुणी इंग्रजांनी आणलेलं पेय म्हणो पण चहाशी असणार आपलं नातं कुणी नाकारू...