निरभ्र आकाश मराठी कविता
पाचूच्या डोंगरांवर मानिकांचे बेट सजले
माझ्या साठी कोणी रत्न महालच बांधले
मंद मंद वाऱ्याची झुळूक अंगावर येई
तिच्या सुगंधाने मन माझे प्रफुल्लीत होई
झाडांच्या आडून चित चोर चंद्र चकवा देई
त्या डोंगर वाटेतून घरी पोहचण्याची घाई
निरभ्र आकाश इंद्रधनुष्यासम सजले
वनाचे सप्तरंगी प्रतिबिंब त्यावर उमटले
मनाच्या गाभाऱ्यातही सप्तरंगी उधळण व्हावी
त्यातून प्रगतीची नवी वाट मज सापडावी
यशाच्या कळसाची मी सोनेरी दोरी व्हावी
शिकवण देणाऱ्या पायथ्याची मज आठवण
रहावी
ह्या सप्तरंगी विचारांनी वन उजळून निघावे
मृत्यूनंतरही ह्माझ्या विचारांचे स्मरण व्हावे
सौ .रुपाली जाधव
बागलाण

Comments
Post a Comment