*ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव* Banaras ,kashi or Varanasi is the spiritual capital of India. वरुण आणि असी नदीच्या काठावर वसलेलं वाराणसी शहर .ह्या शहरात काय काय आहे ?संगीत ,साहित्य ,कला ,संस्कृती ,अध्यात्म ,मोक्ष ,ज्ञान ,घाट इ .विविध अलंकारांनी हे शहर नटलेलं आहे .सर्वात प्राचीन शहर ,त्यातल्या त्यात पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकराच्या त्रिशूळावर वसलेलं शहर .मनात खूप सारी उत्सुकता ,उत्कंठता घेऊन नाशिक हुन आमचा वाराणसी प्रवास सुरु झाला . रात्रीच्या झगमटात सजलेल्या वाराणसीत आम्ही दाखल झालो तेव्हा कुणाच्या तरी लग्नाचे फटाके आकाशाचे सौन्दर्य वाढवत होते .त्या पावन भूमीला स्पर्श करताना ती फटाक्यांची आतिष बाजी जणू आमचे स्वागत करत होती .त्यातच लग्नाच्या वरातीत "दामादजी पधारो हमारे देश " हे लोक गीत चालू होते .साक्षात भगवान भोलेनाथांनी आपल्या लेक -जावयाच स्वागत केलं असा भास आम्हाला झाला .प्रवासाचा थकवा जाऊन आम्ही काशीच्या गर्दीत सामावुन गेलो . काशी विश्वेश्वराला समर्पित ,12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग ज्याच्या केवळ स्मरणाने आपण पाप मुक्त होतो त्या मंदिरात प्...