फादर्स डे निमित्त बाप लेकीचं भावविश्व् आमच्या वडिलांना आम्ही काका म्हणत असु अगदी शुन्यातून त्यांनी त्यांचं आयुष्य उभं केलं आम्ही पाच बहिणी एक भाऊ असा मोठा परिवार . माझ्या आणि काकाश्रींच्या बाबतीत सांगायचे झाले तर काही घटना येथे नमूद करते लहानपणी आम्हा बहिणांना होस्टेलवर शिकण्यासाठी ठेवावं अशी त्यांची खूप इच्छा होती त्या प्रमाणे आम्ही होस्टेल बघूनही आलो पण मला काय दुर्बुद्धी झाली कि मी त्यांना म्हटले कि "काका तुम्हाला आमची लाज वाटते का ?इथे राहील नाही म्हणजे कोणाला कळणार नाही कि तुम्हाला किती मुली आहेत "माझ्या ह्या वाक्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला परत तो विषय कधीच निघाला नाही . त्यानंतर मला लहानपणी मलेरिया झाल्या मुळे दवाखान्यात ऍडमिट करावे लागले .त्यावेळी त्यांना पहिल्यांदाच हळवे झाल्याचे बघितले ."दणकून खायचं आणि दणकून काम करायचं हि त्यांची शिकवण मी आजही पाळते ".आपल्या घरी आलेल्या याचकाला कधीही विन्मुख जाऊ द्यायचे नाही असा त्याचा वसा होता तो आज आम्ही इमाने इतबारे पाळतो . मी 12वीत असतांना पहिली कविता केली त्यांना ऐकविली त्यावर त्या...