*आतुर्ता रायगडची*
*आतुर्ता रायगडची*
ज्या क्षनाची वाट शिवप्रेमी शिवभक्त वर्षभर बघतात त्याच क्षनाला
मुकावे लागणार,तो म्हणजे *सुवर्ण क्षन शिवराज्यभिषेक* मन आता
पासुणच कासावीस होतय तो धुक्यात पावसात सजलेला रायगड
शिवप्रेमीची अफाट गर्दी ढोल ताशांचा आवाच सह्यांद्रीच्या वाऱ्याने
फडकणारे पवित्र भगवे ध्वज शिवभक्तानी डोक्या वरती घातलेले
भगवे फेटे,दिव्यांच्या प्रकाशात फुलानी सजलेल श्री शिर्काई देवीचे
मंदिर,होळीच्या माळा वरील मर्दानी खेळ शिवभक्तांची गर्दी,शिवभक्तानी
गजबजलेली बाजारपेठ,टकमक टोका वरती येणाऱ्या नवख्खा आणि
फोटो शुट प्रेमींची गर्दी,नगार खाण्या समोर पवित्र भगवे ध्वज नंग्या
नाचत्या तलवारी,नगारखाना ते राजसदर शिवकन्या मुलिनी काढलेली
रांगोळी,राजसदरेत छत्रपती शिवशंभू मर्द मावळ्याच्या वरती होणारे
मंत्रमुग्ध व्याख्याने,शाहिरांचे पोवाडे,गडा वरती इतिहास प्रेमींची गड
न्याहळतांनाची आवड,गोदंळ्याच्या सोबत दिवट्या घेऊण भुते बणुन
नाचणारे शिवभक्तानी आई तुळजा भवानीला घातलेला गोंदळ,३ दिवस
गडा वरती येऊण अपल्या राजाचा शिवराज्यभिषेक सोहळा नेत्रदिपक
तेजस्वी आंनदात व्हावा यासाठी रात्र दिवस जटत असलेले शिवप्रेमी
शिवभक्त अदल्या रात्रीही त्याच उस्तहात त्याच जोशाने सजावट कामे
करताना दिसतात,गडा वरतील पाड्या मधील घरात उतकृष्ट अशी पिटले
भाकरी खाऊण ढेकर देण्यात वेगळीच मझ्या,सकाळी होणारे शंक
नाद,ढोल ताशांचे आवाज शिंग(तुतारी),टाळ,विना,मृदुंग आणि
रायगडच्या थंडीत हि सुवर्ण क्षनाची वाठ बघत बसलेले लाखो
लोक,गडावरील इतिहासीक वास्तु मंत्र्याचे वाडे, राजवाडे, राणीवसा,
हिरकणी बुरूज,मनोरे,गंगासागर तलाव,हत्ती तलाव,हणुमान
टाके,कुशावर्त तलाव,वाडेश्वर मंदिर अज्ञात समाधी,वाघ दरवाजा,जग्दीश्वर
मंदिर,छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी,बारा टाकी,दुरूगोळा
कोठार,भवानी टोक, हे सर्व ज्ञाहळत असलेले शिवभक्त,जगदीश्वर
मंदिरा मधुण हजारो शिवभक्ताच्या सोबत राजसदरेकडे निघणारी
छत्रपती श्री शिवरायांची पालखी शिवगर्जना हर हर महादेव जय
श्री राम जय भवानी जय शिवराय अशा असंख्य गर्जनाच्या सोबत
चालेली मिरवणुक,राजसदरेत सुवर्ण क्षन पहाण्यासाठी झालेली
गर्दी,राज्यभिषेकाच्या आधी होणारे अभिषेक मंत्र,शिवगीते,आणि
त्या नंतर सर्वाना हवा असलेला सुवर्ण क्षन अखड हिंदुस्थानचे
छत्रपती श्री शिवराय होतात आपले राजे छत्रपती होतात. त्या
क्षनी रायगड वरती जो आवाज घुमतो तो फक्त एकच छत्रपती श्री
शिवाजी महाराज की जय..
वर्षभर सुवर्ण क्षनाची वाट पहात असतो त्या सुवर्ण क्षनाचे साक्षिदार
होतो आपण,पण महाप्रसादा नंतर गडा वरतुण महाराजाना मुजरा करूण
समाधी फुडे नतमस्तक होऊण जेव्हा पाय परतीच्या घराच्या वाटेकडे
वळतात तेव्हा मन मात्र ढसा ढसा रडत असते चेहऱ्या वरचे हास्य
गायब होते, हास्य गायब होणारच कारण छत्रपतींच्या पदपर्शाने पावन
झालेल्या स्वराज्याची राजधानी श्री रायगडा वरूण जाण्याचे कोणाचे
हि मन करणार नाही,गडाचा पायथा येतो आणि सर्व मागे वळूण श्रीमान
रायगडला छत्रपती श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा
आतुर्ता श्री शिवराज्यभिषेक सोहळ्याची ...

Comments
Post a Comment