कोरोना पडसाद - corona - marathi kavita- poem on corona virus - marthi poem on lockdown corona virus - lockdown indian - Government -Gold Poem
कोरोना पडसाद
कोरोना पडसाद
ह्या ह्या कोरोनाने
तुला काय दिल ?नि मला काय दिल ?
निसर्गाने मानवाची
लायकी दाखवून दिली
आणि आपल्या अस्तित्वाची
दखल दाखवून दिली
जीवनावश्यक गरजा फार थोड्या
आहेत बाकी सर्व आपले चोचले
आहेत ह्याची जाणीव करून दिली
ह्या ह्या कोरोनाने
तुला काय दिल ?नि मला काय दिल ?
आपल्या राज्यात इतके
परप्रांतीय आहेत ह्याची
माहिती करून दिली
त्यात आपल्या महाराष्ट्रीयन
लोकांची कुवत समजून दिली
फेरीवाले ,बाजार ,यात्रा
करणारे किती हातावरच
जीवन जगतात ;त्यांना
हातावरच जेवायची वेळ आणली
ज्या मोठया लोकांना
कोणत्याही संधीच सोन करायची सवय
होती ती त्यांनी करून घेतली
आणि म्हणूनच गरीब -श्रीमंतांची
दरी हि अजूनच वाढली
ह्या ह्या कोरोनान
तुला काय दिल ?नि मला काय दिल ?
गरिबांना सरकारनं तारलं
श्रीमंतांनी स्वतःलाच तारलं
मध्यम वर्गींयांनी नेहमीप्रमाणे
स्वतःच्या इच्छानाच मारलं
कोणी रुळावर चिरडलं गेलं
तर कुणी अपघातात गेलं
थोडं बाकी असेल म्हणून काय तर
नक्षली आणि आतंक वादी
हल्ल्याचं प्रात्यक्षिकही झालं
ह्या ह्या कोरोनान
तुला काय दिल ?नि मला काय दिल ?
एक वाक्य कुणीतरी
आम्हाला फेकून मारलं
"तुम्ही खबरदारी घ्या
आम्ही जबाबदारी घेतो "
कानांना ऐकायला फारच छान वाटलं
प्रत्यक्षात मात्र त्या
सर्वांनी खबरदारी घेतली
अन् आपल्या आपल्या जबाबदारीवर
आपल्याला पाहून घ्यायला लावलं
ह्या ह्या कोरोनान
तुला काय दिल ?नि मला काय दिल?
कुणासाठी तो देवदूत बनून आला
कधी खेड्या कडे न फिरणारी
शेतात दिसू लागली
म्हताऱ्या जीवाची
विचारपूस करू लागली
तर कोणा जीवासाठी तो
काळ बनून आला
क्वारनटाईन ,हैड्रो क्लोरीन
आयसोलेटेड .’कंटेन्टमेंट सारखे
कालपरवा पर्यंत माहिती हि
नसलेले शब्द शिकवून गेला
ह्या ह्या कोरोनान
तुला काय दिल ?नि मला काय दिल ?
लग्न आणि मौत ह्या सारखे
विधी कमी लोकांत हि होतात
हे शिकवून दिल
पण त्यामुळे अनेकांच्या
रोजगाराच जणू साधनच
हिरावलं गेलं
बाजार पेठेतील
दरवळ त्यानं थांबवली
कुणी म्हणे त्याच्या मुळे
नदी ,नाले ,रस्ते स्वच्छ झाली
इतकेच काय ओझोनची
पातळीही त्यानं सुधरवली
ह्या ह्या कोरोनान
तुला काय दिल ?नि मला काय दिल ?
सामान्य गृहीणी कालही
आपली ड्युटी इमाने इतबारे करत होती आणि
कायम करतच राहणार आहे
आपलं मन रमवायला तीन केला
नथीचा नखरा ,अन काही चॅलेंज तर
इतरांच्या पोटात दुखायचे
काय कारण आहे ?
ह्या ह्या कोरोनान
तुला काय दिल ?नि मला काय दिल ?
©️®️सौ .रुपाली राहुल जाधव
( ©Copyright Gold Poem )

Great message passed on by poem, great going keep it up..!!💯
ReplyDelete