संभाजी महाराज कविता - संभाजी महाराज मराठी कविता - Sambhaji Maharaj Kavita in Marathi - Vichar - Lek -Quotes -Gold Poem
शीर्षक-शिवबाचा छावा
फाल्गुन वद्य मास
हस्त नक्षत्रावर
छावा जन्मला
पुरंदर किल्ल्यावर
स्वराज्याचा वारस
शत्रूंचा कर्दनकाळ
सईबाईंच्या पदरी
असा जन्मला बाळ
स्वराज्याला पुत्र झाला
खलिता धाडला चोहीकडे
बाळाचे मोहकरुप
पाहताच काळीज धडधडे
सईबाईंनी मनावर घेऊनी
घडवला छावा शिवबाचा
संभाजी राजे नामाभिधान
राजा हा रयतेचा
त्रिवार नमन अमुचे
या शिवबाच्या छाव्यास
जन्मदिनी सुमनांजली वाहते
शब्द गुंफूनी काव्यात
सौ हेमलता विसपुते
वाशिम
Copyright © Gold Poem

Comments
Post a Comment