एक विनंती वजा पत्र - एक व्यापारी - मायबाप सरकार - मोदी सरकार
आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत
एक व्यापारी
सौ .रुपाली राहुल जाधव
बागलाण ©️®️
मायबाप सरकार
पुन्नच एकदा कळकळीची विनंती वजा पत्र
आपल्याला जर कोरोना बरोबरच जगायचे आहे तर हे लॉक डाऊनचे नाटक कशाला ?तब्बल 2महिने घरात .सुरवातीचा काळ आम्ही आनंदाने उपभोगला ,पण आता भीती वाटते आहे .
"आत्मनिर्भर "उच्चारायला जड ,कानांना चांगला वाटला .पण माझ्या सारख्या पामराच्या पार डोक्यावरून गेला ."आत्मनिर्भर "होण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं ह्याचा खुलासा झाला असता तर बरे वाटले असते .
आजही आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे नाहीच मिळाली .खूप गर्दीच्या ठिकाणा बाबत आम्ही समजू शकतो पण आमच्या सारख्या मध्यम व्यापाऱ्यांच काय ?
तर "आत्मनिर्भर "होऊन तुमचं तुम्ही पाहून घ्या असा अर्थ आम्ही काढायचा का ?
शाळा ,कॉलेज ,कलासेस च्या ऑनलाईन शिकवणी बाबत तर न बोललेच बरं .फक्त एक फार्स तयार होतो आम्ही ऑनलाईन शिकवतो आहे ,आमची मुलं ऑनलाईन शिकत आहे ......मोठ्या वर्गाचं तरी ठीक पण लहान मुलांना ऑनलाईन चा मारा म्हणजे लॉक डाऊन उठल्यानंतर सर्वात जास्त गर्दी डोळ्यांच्या डाँ .कडे असणार आहे .लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांचचस्क्रिन टाइम वाढला आहे .
स्वदेशी ,स्वदेशी ऐकायला खूप गोड वाटणारा अजून एक शब्द पण मायबाप आम्ही तर कोणतीही वस्तू घ्यायला परदेशात जात नाही ना ?त्या आपल्या देशात येऊ न देणं आपल्याच हातात आहे ना ?
एकीकडे दारू मुळे होणारे नुकसान ,कौटुंबिक हिंसाचार ,विविध ठिकाणी छापे टाकणे आणि दुसरीकडे पोलीस बंदोबस्तात दारू विक्री ह्या सारखा मोठा विरोधाभास कुठेही नसेल .
आमच्या सारख्या मान मोडून सर्व टॅक्स भरण्याऱ्या साध्या व्यापाऱ्याचा पैसे नेमका कुठे जातो ते समजेल का ?आम्हाला तर कोणत्याही सवलती नाही कि कर्ज माफी नाही .मला तर भीती वाटते सम्पुर्ण लॉक डाऊन झाल्यावर आमच्या मानगुटी अजून एखादा "आत्मनिर्भर "नावाचा टॅक्स बसावा .
आपल्या वर पूर्ण विश्वास असलेली ,
आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत असणारी
एक मध्यम व्यापारी
सौ .रुपाली राहुल जाधव
बागलाण ©️®️
Copyright © Gold Poem

Comments
Post a Comment