संभाजी राजे - संभाजी महाराज कविता - संभाजी महाराज मराठी कविता -Sambhaji Maharaj Kavita in Marathi shivbacha bal -sambhaji raje
विषय -संभाजी राजे
शीषर्क -शिवबाचा बाळ
लाडका बाळ शिवबाचा
अन सईचा
पोरका झाला असतांना
दोन वर्षाचा
स्वराज्याची धुरा सांभाळली
यवनांची दाणादाण उडविली
एका हाती तलवार घेतली
दुसऱ्या हाती लेखणी पेलली
बुधबुधभूषण राजनीती ग्रंथ लिहिला
तरंगता तोफखाना तयार केला
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात
हा शूर योद्धा खेळला
एकही लढाई न हरण्याचा
मान मिळवला
दृष्ट यवनांच्या तावडीत सापडला
स्वराज्यासाठी बलिदान देता झाला
घरच्या फितुरीमुळे सिंहाचा
छावा जेरबंद झाला
त्याच्या जाण्याने अवघा
सह्याद्री पोरका झाला
-सौ .रुपाली जाधव
बागलाण
Copyright © Gold Poem

Comments
Post a Comment