कोरोना इफेक्ट
सखींनो तुमचं मला
माहिती नाही
पण मी खूप मिस करते आहे ....
आपलं ते एकत्र येणं
अनेक सामाजिक ,धार्मिक
कार्यक्रमानिमीत्त भेटणं
आपली ती किटी पार्टी
आपलं ते हसणं ,बोलणं
एकमेकांच्या सुख -दुःखात
सहभागी होणं
सखींनो तुमचं मला
माहिती नाही
पण मी खूप मिस करते आहे ...
ती देवी मंदिरातील
आरतीचा नाद
ती बालोपासेनची
भगवंताला घातलेली साद
शाळकरी मुलांचा
चिवचिवाट
अन बाजारपेठांमधील
झगमगाट
सखींनो तुमचं मला
माहिती नाही
पण मी खूप मिस करते आहे ...
ती आपली वैचारिक बैठक
ती आपली साहित्यिक चर्चा
कार्यक्रमांची मैफिल अन
ज्ञानाची चर्चा
ती लग्नाची पंगत
सणांची रंगत
ती पेठेतील दरवळ
अन मैत्रीची हिरवळ
सखींनो तुमचं मला
माहिती नाही
पण मी खूप मिस करते आहे ...
तो हलकासा मेकअप
ती छानशी साडी
ती आपल्या मैत्रीतली
गोडी
ते फॅमिली गेट टुगेदर
अन ती छोटीशी सफर
सखींनो तुमचं मला
माहिती नाही
पण मी खूप मिस करते आहे ...
कोण कुठला कोरोना
काय दिवस त्याने आणले आहे
आताशी कुठे स्वतःसाठी जगू
पाहणाऱ्या गृहिणींना त्याने
अजूनच लॉक डाऊन केलं आहे
ती काल हि किचन
ओट्याजवळ आवडीनं उभीच होती
आज आणि उद्या हि
राहणार आहे पण
ह्या कोरोनामुळे तिच्या
छोट्याशा गगन भरारीलाही
नजर मात्र लागणार आहे ...
सखींनो तुमचं मला माहिती नाही
पण मी तुम्हाला खूप मिस करते आहे
थोडासा यमक साधून माझ्या
भावनांना मोकळी वाट करून देत आहे
-©️®️सौ .रुपाली राहुल जाधव 🖋🖋🖋
बागलाण

कवितेतून भावना भिडते मनाला
ReplyDelete