जेंव्हा काय हवे मला अस कोणी विचारेल...
तुझी सतत झलक,
तुझ्या साथीची ग लगबग,
तुझ्या अंगाची महक,
बस हेच हवे मला बघ!
तुझ्या केसांची चादर,
तुझ्या चुनरीचा तो रंग,
तुझी स्पर्शती लहर,
बस हेच हवे मला बघ!
तुझी माझ्याकडे धाव,
तुझ्या मिठीतली ती धग,
तुझ्या ओठांची चव,
बस हेच हवे मला बघ!
पावसात तुझी साथ,
चिंब माझं जग।
सोबत चहा चा घोट,
बस हेच हवे मला बघ!
बस हेच हवे मला बघ!!
— Premachya Charoli
Gold Poem

Comments
Post a Comment