भाकरीचा चंद्र - मराठी लेक - कोरोना वायरस लोखड़ौन - भारत का मज़दूर - कविता Labour Returning To Home Article Poem
भाकरीचा चंद्र
भाकरीचा चंद्र शोधण्या साठी तू मैलोन्मैल चालू लागला .आपलं बिऱ्हाड पाठीवर घेऊन काटेरी वाट तुडवू राहिला .खरंच आज मजुरांचे त्यांच्या गावी परतणारे लोंढे पहिले तर हि सर्व हातावर पोट घेऊन जगणारी मंडळी .रोजचं आणून खाणारी सामान्य जनता .
आज सहज आठवून पाहिलं बांधकाम व्यवसायात प्लम्बिंग ,फरशी ,प्लास्टर ,पियुपी ,रेलिंग ह्यांसारखे अनेक छोटे मोठे काम करणारे हे मजूर ,हॉटेल व्यवसायाचे मजूर ,मिठाई ,फरसाण वाले कारागीर ,भेळ ,पाणीपुरीच्या गाडी वाले ,फर्निचर करणारे ,रंग कारागीर असे एक ना अनेक ह्या सर्वांवर आपण किती अवलंबुन आपल्या बाजार पेठा किती अवलंबून ?
हा हातावरचा मजूर वर्ग आज आपल्या गावी मिळेल त्या साधनाने ,प्रसंगी जीवावर उदार होऊन जायला तयार आहे .रोज वर्तमानपत्र उघडले कि एक तरी बातमी ह्या कष्ट करणाऱ्याचा अपघाताची असते .कुठे ट्रकला अपघात ,तर कुठे बसला अपघात .
ह्या सगळ्या अपघातात भीषण अपघात रुळावर झोपलेल्या मजुरांचा होता .काय विदारक दृश्य होते ते कोणती स्वप्न घेऊन झोपले असतील आणि काय घडले सकाळी ?ह्या सर्वांचे असे हाल बघितले तर कलयुगाच्या अंतिम चरणाची सुरुवात झाली आहे असे वाटते .यमराज आपला कोटा पूर्ण करून घेतो आहे काय ?कोरोना मुळे काय ?अपघातात किती बळी ?
ह्याचा विचार सुद्धा भयावह वाटतो आहे .
रोजची अर्थव्यवस्था ज्या महत्वाच्या घटकावर अवलंबुन होती तो घटक स्थलांतर करतो आहे .कोणी म्हणेल आम्ही त्यांना अन्न ,धान्य पुरवीत आहोत पण कोणाचे ऍन किती दिवस गोड लागेल हो ,त्यांनाही वाटत असेल ना आपल्या लेकरांना आपल्या हाताने करून खाऊ घालावं किती दिवस असे दुसऱ्याने दिलेल्या अन्नावर ते राहतील .
आज सर्व बंद आहे म्हणून ठीक उद्या जर लॉक डाऊन उघडले आणि वेगवेगळ्या कामांना गती मिळाली तर हा मजूर वर्ग परत येईल का ?किती तरी उद्योगांवर ह्याचा परिणाम होईल ह्याचा विचार झाला का ?आता कोणी म्हणू नका मराठी माणसाला उद्योगाची आणि प्रगतीची संधी आहे .पण ह्या सर्व कामांमध्ये मराठी माणसाचं अस्तित्वच नाही .नाही तर हि परप्रांतीयांची संख्या इतकी झाली च नसती .मराठी माणसाला कोणताच धोका पत्करायचा नसतो .आपण भले आणि आपले सुरक्षित काम भले .हि वृत्ती जोपासलेली माणसं अचानक ह्या सर्वांची जागा घेऊ शकत नाही .(विज्ञानाच्या नियमाला अपवाद असतात तसे ह्यालाही असतील )
असो
भाकरीचा चंद्र शोधाया
तू पायी रस्ता तुडवला
तुझ्या जिद्दी पुढे
त्यानंही माथा टेकवला
तुझ्या गावा सोबत
तुझी भेट होऊ दे
तुझ्या कष्टांचे
चीज होऊ दे
हि प्रभू चरणी
माझी प्रार्थना
पूर्ण होवो
तुझ्या कामना
सौ .रुपाली जाधव
बागलाण

अतिशय सुंदर लिहीलं आहे. लाॅकडाऊन मधे घरी परत जाणार्या मजुरांचे जे हाल झालेत त्याला क्षमा नाही.
ReplyDelete