अष्टाक्षरी
विषय -माणुसकी
माणुसकी शिकण्यास
शाळेत प्रवेश घ्यावा
माणुसकीच्या पाठांचा
मीच कित्ता गिरवावा
कोणी म्हणे खुप वाव
माणुसकीच्या प्रगतीला
इथे नाही स्पर्धा कोण्या
दुसऱ्याशी घडण्याला
माणसाच्या हृदयात
धबधबा वाहु द्यावा
माणुसकीचा अखंड
सर्वांना जीव लावावा
निर्सगाच्या प्रलयात
माणुसकी बहरली
एकमेकांना मदत
करण्यासरसावली
दुखवल नाही मन
कोणाचं तरी जपली
माणुसकी समजावे
हीच संस्कृती आपली
-सौ .रुपाली जाधव
बागलाण
Copyright © Gold Poem

Comments
Post a Comment