🖋️🖋️🖋️ *सौ .रुपाली राहुल जाधव * *व्यवहारावर बोलु काही * व्यवहार हा शब्द लिहायला ,वाचायला जितका अवघड तितकाच तो जपायला हि तितकाच अवघड .मुळात तो जोडाक्षर असल्यामुळे बऱ्याच जणांच्या पचनी पडत नाही .आपण आपल्या दैनंदिन जीवनात बरेच व्यवहार करत असतो .त्या पैकी आज आपण सोन्या -चांदीच्या व्यवहारावर बोलू काही .आपल्या भारतात सोने गुंतणुकीला फार महत्व आहे .शास्रात सोने खरेदीचे साडेतीन मुहूर्त ,गुरूपुष्य अमृत योगा च्या खरेदीचे अनन्य साधारण महत्व आहे .*सोन्या -चांदीचा व्यवहार तितक्याच निगुतीनं झाला पाहिजे ,जपला पाहिजे .* प्रथम ग्राहकाने ठरवायला हवं आपण सोने -चांदी गुंतवणूक म्हणून घेणार ,हौस म्हणून घेणार कि लग्न कार्यासाठी म्हणून घेणार ? गुंतवणूक म्हणून घ्यायचं तर चोख सोने ,वेढे ,कॅडबरी ,(खाण्याची नाही हं 😀),भिस्कीट स्वरुपात घ्यावी . परंतु आपणास जेव्हा हौस म्हणून दागिने घ्यायचे असतात ते आपण कोणत्या स्वरूपात घ्यायचे ते ठरवून घ्यावे 24कॅरेट मधील पाटल्या ,बांगड्या ,पोहे हार ,डाई पोत ,चैन ,गोफ इ .इ . फॅन्सी दागिने हे शक्यतो 22कॅरेट ,हॉल मार्क पासिंग असणारेच घ्यावे .म्हणजे exchange करण...