*मी लेक सावित्रीची *
सावित्री माय केवळ तुझ्यामुळे
आज मी इथे उभी आहे
तू झेलले लोकांचे शेण ,गोळे मोठ्या मनाने
म्हणुन मी आज इथे
बोलते आहे ताठ मानेने.
सावित्री माय केवळ तुझ्या मुळे
माझ्या पाटीवर अक्षरे कोरली गेली
ज्योतीबांच्या साथीमुळे विधवांच्या
नशिबाची द्वारे खुली झाली
सावित्री माय तू ज्योतिबांसाठी
कि ज्योतिबा तुझ्या साठी जगले
हा मुददा गौण आहे
पण तुम्हा दोघांच्या पुण्याईने
आमच्या जगण्याचा स्तर उंचावला आहे
सावित्री माय केवळ तुझ्या मुळे
अनाथांना आश्रय मिळाला
तुम्ही सामाजिक कार्याचा विडा उचलला
त्यामुळे आजच्या स्रिया ह्या
केवळ उंबरठ्याआड नाही अडकल्या
माऊली तुझे अनंत उपकार
आम्हा पामरांवर
तूच शिकविले आम्हा प्रेम
करण्यास अक्षरांवर
अखंड तेवत राहील माझ्यात
ज्योत क्रांतीची
आजच्या हि शुभदिनी
शब्दांजली देते *मी लेक सावित्रीची *
-🖋🖋©️®️
सौ .रुपाली राहुल जाधव
बागलाण
Comments
Post a Comment