*ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव*
Banaras ,kashi or Varanasi is the spiritual capital of India. वरुण आणि असी नदीच्या काठावर वसलेलं वाराणसी शहर .ह्या शहरात काय काय आहे ?संगीत ,साहित्य ,कला ,संस्कृती ,अध्यात्म ,मोक्ष ,ज्ञान ,घाट इ .विविध अलंकारांनी हे शहर नटलेलं आहे .सर्वात प्राचीन शहर ,त्यातल्या त्यात पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकराच्या त्रिशूळावर वसलेलं शहर .मनात खूप सारी उत्सुकता ,उत्कंठता घेऊन नाशिक हुन आमचा वाराणसी प्रवास सुरु झाला .
रात्रीच्या झगमटात सजलेल्या वाराणसीत आम्ही दाखल झालो तेव्हा कुणाच्या तरी लग्नाचे फटाके आकाशाचे सौन्दर्य वाढवत होते .त्या पावन भूमीला स्पर्श करताना ती फटाक्यांची आतिष बाजी जणू आमचे स्वागत करत होती .त्यातच लग्नाच्या वरातीत "दामादजी पधारो हमारे देश " हे लोक गीत चालू होते .साक्षात भगवान भोलेनाथांनी आपल्या लेक -जावयाच स्वागत केलं असा भास आम्हाला झाला .प्रवासाचा थकवा जाऊन आम्ही काशीच्या गर्दीत सामावुन गेलो .
काशी विश्वेश्वराला समर्पित ,12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग ज्याच्या केवळ स्मरणाने आपण पाप मुक्त होतो त्या मंदिरात प्रत्यक्ष जाऊन भगवंताच्या चरणी लीन होता आले .कडक पोलीस बंदोबस्तात बाबा विश्वनाथांचे दृष्यब् घेऊन आम्ही घाटांचे सौन्दर्य बघण्यास झालो .ह्या नदीवर एकूण 85 घाट आहेत .त्यातील महत्वाचे घाट दशाश्वमेध घाट ,असी घाट ,मणिकर्णिका घाट ह्यांसारखे अनेक घाट आहेत .हे घाट आपण पायी फिरून पूर्ण बघू शकतो किंवा नावेतून बसून बघू शकतो .आम्ही नाव बुक करून सगळ्या घाटांचे जवळून दर्शन घेतले .घाटांवरती असलेले तुलसी मानस मंदिर ,संकट मोचन हनुमान मंदिर ,दुर्गा माता मंदिर तसेच श्री अन्नपुर्णा माता मंदिर इ .मंदिर घाटांची शोभा अजूनच वाढवतात .येथे प्रमुख 2/3घाटांवर सायंकाळी गंगेची नयनरम्य आरती होते .आम्ही प्रमुख दशाश्वमेध घाटावर होणाऱ्या आरतीत सहभागी झालो .अहाहा !काय ते सौन्दर्य ,काय तो नाद ,काय तो ताल त्याचे शब्दात वर्णन केवळ अशक्य .आरती सुरु असताना गंगा माता देखील शांत होऊन तिचे कौतुक करवुन घेत होती .गंगा आरतीचा अनुभव आपण स्वतःच घ्यावा .अशा अवर्णीय ,अलौकिक कार्याचे साक्षीदार आम्ही होऊ शकलो हे आमचे भाग्य .घाटांमधील मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर 24तास चिता जळत असतात .देवी पार्वतीच्या कानातील कर्णफुलं ह्या घाटावर पडले होते म्हणून त्यास मणिकर्णिका हे नाव पडले अशी मान्यता आहे .असं म्हटलं जातं काशीत देह ठेवल्यावर त्या व्यक्तीला मोक्ष लगेच मिळतो जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होते.प्रचंड गर्दीतही ह्या घाटांवरची शांतता एक वेगळीच हुरहूर निर्माण करतं .जळणाऱ्या चितांकडे पाहून आपण फक्त नतमस्तक होतो .त्याच वेळी नकळत आपल्या अंगी असलेला अहंकार ,अभिमान गळुन पडतो .कानात महामृत्युंजय मंत्राचा स्वर घुमतो ."ओम त्र्यंबकम यजमहीं ...."
काशीचे कोतवाल समजले जाणारे कालभैरव ह्यांचे मंदिर 8/9किलो मीटर अंतरावर आहे .त्यांचे घेतल्या शिवाय काशी विश्वेश्वराचे दर्शन पूर्ण होत नाही असे समजले जाते .मग काय आमची टमटम ची स्वारी कालभैरवाचे दर्शन करण्यास सुरु झाली ."*काशिका पुराधिनाथ काल भैरवं भजे "* वाराणसी जवळच असणारे सारनाथ हे गौतम बुद्धांना समर्पित असणारे ठिकाण आहे .येथील मुख्य आकर्षण गौतम बुद्धांची अतिशय विशाल असणारी मूर्ती ,येथे असणारे संग्रहालय ,संपुर्ण सारनाथ चा इतिहास दर्शवणारे स्तूप आणि बरेच काही .ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा करावी .गदोलीया चौक हा महत्वाचा भाग .सर्व गरजेच्या वस्तूंचं मार्केट येथे उपलब्ध आहे .प्रसाद ,खेळणी ,आकर्षक वस्तुंनी हि बाजारपेठ सजली आहे .हिवाळ्यात खास उपलब्ध असणारे *'मलयो*' हा एक इथला महत्वपूर्ण पदार्थ आहे .त्याचा आस्वाद घ्यायलाच हवा .बनारस में आकर बनारसी पान न खाया तो क्या खाया ?तर असे हे बहुप्रसिद्ध असणारे बनारसी पान खायलाच हवे .त्या प्रमाणे काशी चाट भांडार मधील चाट ,ब्लु लस्सी मधील लस्सी ,तसेच प्रसिद्ध कुल्लड मधला चहा इ.अनेक खाद्य पदार्थांची रेलचल आपल्याला बघायला मिळते .आपली आवड आणि आपली सवड लक्षात घेऊन ह्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा .
बनारसी सिल्क साडी तर आम्हा स्रियांचा weak point .आपल्या कडील लग्न बस्त्यात एक तरी बनारसी साडी असतेच .तर अशा अनेक पैलूंनी नटलेल्या ह्या शहराचे वर्णन करावे तितके कमीच आहे .पण नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा ह्या शहराच्या दोन बाजू आम्हाला प्रकर्षाने जाणवल्या .लोकल दुकानांमध्ये गरजेच्या वस्तू लपवुन मागच्या बाजूला ठेवलेलं तर गुटखा ,पान ,तंबाखु हे सरार्स विक्रीला पुढे मांडून ठेवलेल .बनारस च्या गल्ली बोळात असलेला लाल रंग हा त्या थुंकणाऱ्या लोकांचीच देणगी आहे .मला तर वाटत इथली लहान मुले दुधाऐवजी पान खाऊनच मोठी होत असतील .ह्या सर्वांमुळे होणारी अस्वछता ज्याचे वर्णन न केलंच बर .प्राचीनशहर असल्या मुळे अरुंद गल्ली बोळ समजू शकते पण प्रत्येक गल्ली बोळात असणाऱ्या महावितरणच्या वायरींच्या विणलेलं जाळ्यांचा गुंता काही समजत नव्हता आणि सहनही होत नव्हता .एखाद्या स्त्रीने तिच्या केसांचा गुंता गुंडाळून न ठेवता तसाच भिरकावला त्या प्रमाणे त्या वायरीचा गुंता आम्हाला दिसत होता .मंदिर परिसरात असणारी स्वच्छता संपूर्ण वाराणसीत दिसली तर ह्या शहराचं सौन्दर्य काही वेगळंच भासेल .येथे येणारा प्रत्येक भाविक भक्त आपल्या सोबत एक स्वच्छ ,सुंदर अनुभव घेऊन जाईल .
असो चंद्रावर असणाऱ्या डागाप्रमाणे वाराणसीच्या ह्या गोष्टी दुर्लक्ष केल्या तर बाकी प्रवासानं आपल्या ज्ञानात ,अध्यात्मात ,अनुभवात वाढ च होते .बोला पार्वती पती हर हर महादेव 🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment