२)कै. गोटू गणूशेठ ब्राह्मणकर , जायखेडा.
३)कै. शिवराम शेठ शिंपी, मुल्हेर.
४)कै. केशव कृष्णाशेठ, वीरगाव.
५)कै.तानाजी कृष्णाशेठ बागड,सटाणा
६)कै.अजबा विठ्ठल सोनवणे पाटील,सटाणा
७) कै. रामचंद्र विठोबाशेठ, लोहनेर.
८)कै. तानाजी राघोशेठ, मेशी.
९) कै. श्रीधर गोपाळ खरे वकील, सटाणे.
या मंडळींनी अथक परिश्रम करून मंदिर व रथाची उभारणी केली. किती तरी प्रकारच्या
परवानग्या त्यांनी काढल्या असतील..महाराजांवर प्रचंड विश्वास ठेऊन ही मंडळी तेव्हा दिवस रात्र झटली असेल. त्याकाळात वीज, रस्ते नसतील, पाण्याचे हाल. बेभरवशी पाऊस त्यात परकीय सत्ता..अशा कठीण परिस्थितीत ही लोक केवढ्या संयमाने वागली असतील.. ज्यावेळी पहिला रथोत्सव निघाला असेल त्यावेळी केवढी मोठी जबाबदारी असेल.. आता रथ मिरवणूकीत पोलीस काकांवर किती मोठी जबाबदारी असते..तेव्हा तर परकीय सत्ता होती. त्यावेळेच्या तत्कालीन पोलीस पाटीलांवर सुद्धा केवढी मोठी जबाबदारी असेल.. सोपे नव्हतेच ते..
पुढे १९५० ला trust act लागू झाला.. देवमामलेदार मंदिरांचे ट्रस्ट झाले..
१९६९ व १९७२ मध्ये मंदिराला पुराचा फटका बसला.. त्यामूळे तत्कालीन ट्रस्ट प्रमुख कै. पंडित धर्माजीराव पाटील यांनी सीमेंट चे मंदिर बांधायला घेतले.. पण भाऊ काकांचे निधन झाल्यामुळे ती धुरा तुकाराम दादा सोनवणे यांनी उचलली. पुढे मंदिर जीर्णोद्धाराचे काम आताचे देवस्थान अध्यक्ष अतिशय संयमी भा. के. बागड (आप्पासाहेब) यांनी पूर्णत्वास नेले. सोपे नव्हतेच हे सुद्धा..
रथ असतो म्हणजे नेमके काय असते हो.. रथ दर सफला एकादशीला असतो.. आपल्या सटाण्याची यात्रा असते.. हे आपण सर्व म्हणतो पण त्या रथ -यात्रोत्सवासाठी कित्येक हात झटत असतात.. क्रमाक्रमाने मी त्यांच्या बद्दल ही बोलतो.. सर्वात पहिला नंबर येतो. देवस्थान ट्रस्ट चा..
देवस्थान ट्रस्ट मधील सर्व ट्रस्टी एका टीम प्रमाणे ३ महीने अगोदर पासून कामाला लागते. एक महिना आधीपासून सर्व नियोजन, सरकारी पत्रव्यवहार केले जातात. मंदिराची स्वच्छता, रथ स्वच्छता, मूर्ती स्वच्छता, यात्रेचे नियोजन, मिरवणूकीचे नियोजन, बाहेरील लोकांच्या मुक्कामाची, निवाऱ्याची, अन्न-पाण्याची व्यवस्था लावणे, पूजेची तयारी, यात्रेतील दुकानांना दुकानाची जागा allotment करने, त्या इतक्या वर्षाच्या वह्या सांभाळणे. प्रत्येकाला ती जागा मोजून देने, प्रत्येकाशी संयमाने वागणे. कोणाचेही मन दुखायला नको..हे जपणे.सोपे नाहिये हे सर्व.. अवघड आहे... साधे काही करायला गेलो तर आपली किती चिडचिड होते.. इथे तर केवढी जबाबदारी आहे.. पण हे सर्व तसे सोपे व्हायला साक्षात महाराजांचा आशीर्वाद आणि टीम लीडर चा अनुभव कामात येतो.. या टीम चे लीडर म्हणजे आप्पासाहेब अतिशय संयमी आणि स्थितप्रज्ञ व्यक्ती, एक असे सन्यंस्थ उद्योगी योद्धा जे प्रत्येक कामावर चौकस नजर ठेउन कामे पूर्णत्वास नेत आहे. त्यामुळे सर्व ट्रस्टींना मनापासून सलाम... सोपे नसते हे सर्व...
दुसर्या क्रमांकावर येतात.. तहसीलदार साहेब तथा न्याय दंडाधिकारी.. रथ-यात्रोत्सव सुरळीत पार पडावा म्हणुन महिनाभर आधीपासून जिल्हाधिकारींना सर्व पत्रव्यवहार करने. नियोजन राखने .. सोपे नसते हे सर्व. .
तिसर्या क्रमांकावर येतात... पोलीस निरीक्षक साहेब.. यांचेवर फार मोठी जबाबदारी.. नुसता रथोत्सव नाहीतर २० दिवसांच्या यात्रेची जबाबदारी. कायदा-सुव्यवस्था राखणे, धार्मिक वादविवाद न होऊ देणे, बॅनर बाजी न होऊ देणे, रथ मिरवणूकीतील गर्दीचे नियोजन, चोरी-मारी न होऊ देणे. हे सर्व नियोजन आपले पोलीस काका तहान-भूक विसरून अतिशय संयमाने करीत असतात. सोपे नसते हे सर्व..
चौथ्या क्रमांकावर येतात.. नगर पालिका प्रशासन.. यांचेवर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. रथ मार्गाची स्वच्छता, पथदिवे, कचरा नियोजन, बाजार नियोजन, यात्रा नियोजन, कर नियोजन, आणि हे सर्व करायचे तेही कुठलाही पक्षपात न करता.. सोपे नसते हे सर्व..
पाचव्या क्रमांकावर येते ते मंडळ.. आणि सर्वात मोठे नियोजन.. मंडळ काय आहे.. मंडळ म्हणजे रथ सेवेकरी.. यांचे काम मात्र वर्षभर चालू असते.. गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव, राम नवमी असो की शिवजयंती. किंवा कुठलीही धार्मिक मिरवणूक .. मंडळ ,देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा जागर करते.. २२ वर्षांंपासून आजतागायत सुरू असलेला भंडारा, रथ ओढण्याचे प्रशिक्षण एक पीढ़ी दुसर्या पिढीला देत आहे. मंडळात शंभराच्या वर मुले आहेत पण आजपर्यंत कधीही कुठल्याही कारणाने राग रुसवा झाला नाही.. विविधतेत एकता म्हणतो ना त्याचे उत्तम उदाहरण.. आता सुद्धा मंडळातील आमचे तेजस भाऊ आणि कुणाल भाऊ यांनी महाराजांवर एक स्तवन रचले. ४ दिवसापासून सटाण्यातील प्रत्येक चौकात पथनाट्य सादर करून मंडळातर्फे रथ जागर केला जात आहे. मंडळ एकसंध ठेवण्याचे काम गणेश खुटे , गणेश मोरे अतिशय काळजीने करतात. तर मंडळात ऊर्जा आणण्याचे काम आमच्या सर्वांचा लाडका अब्दुल बोहरी करत असतो.. अशी कुठलीच धार्मिक मिरवणूक नाही की जिथे अब्दुल नाही. अब्दुल शिवाय मजाच नाही उत्साहच नाही. इतके ते साधे सरळ लॉजिक आहे.. सोपे नसते हे सर्व..
खरच सांगतो सोपे नसतेच हे सर्व.. त्यामुळे रथ आणि यात्रोत्सवासाठी झटणार्या या शेकडो हातांना मनापासून सलाम...
बोला यशवंतराव महाराज की जय...
-रोहित जाधव, गड सेवक

Comments
Post a Comment