साहित्य सखी महिला साहित्यिक मंच ,नाशिक आयोजित चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उदघाटक माननीय दिशा पिंकी शेख ह्यांचा परिचय .
भारतात विविध कारणावरून समाजात भेदभाव आहेत .ह्यातूनच विविध वंचित समूहाच्या चळवळी निर्माण झाल्या .या चळवळींचं प्रमुख माध्यम म्हणजे सोशल मिडिया .अशा सोशल मीडियातूनच पुढे आलेल्या पारलिंगी समूहातील स्त्री कार्यकर्त्या म्हणजेच माननीय दिशा पिंकी शेख होय .
'शब्द वेडी दिशा ' या नावाने फेसबुक पेज वर लिहून त्यांनी स्वतःची आपली ओळख निर्माण केली .बिनधास्तपणे व्यक्त होणारी एक संवेदनशील कवयित्री .आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत .त्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्यही आहेत .
मूळच्या नाशिक जवळील येवला येथील असून सध्या श्रीरामपूर येथे वास्तव्यास आहे .डाँ .बाबासाहेब आंबेडकरांना त्या आपले आदर्श मानतात .त्यांचा शब्द प्रकाशनने प्रकाशित केलेला "कुरूप" हा काव्य संग्रह स्वतःच एक राजकीय विधान आहे .त्यांच्या कवितांमध्ये दिशा ताईचं एक ट्रांसवुमन म्हणुन जुन्यापासून नव्या पर्यंतचा प्रवास सापडत जातो .
"सहानुभूती नकोय समंजस स्वीकार द्या .असं ठाम विधान दिशा ताई आपल्या कवितांमधून मांडत असतात .लौकिक अर्थानं त्यांचं शिक्षण जरी कमी झालेलं असलं तरी त्यांची बुद्धिमत्ता ,विचार एका phd झालेल्या माणसालाही लाजवेल .खरं त्यांचं शिक्षण आपल्या समाज व्यवस्थेनं ,समाजाच्या कोत्या मानसिकतेने होऊ दिल नाही .आपला महिलांना दुय्यम तरी स्थान दिल जात पण पारलिंगी समूहाचं अस्तित्वच नारकरल जात .जिथं आपल्या असण्याची लढाई लढावी लागते तिथे इतरांसाठी काही करण्यासाठी फार जिद्द हवी .ती जिद्द ,ती ताकद दिशा ताईंमध्ये आहे .त्या नेहमीच चाकोरी बाहेरचे विचार मांडत असतात .त्यांच्या कवितांमधून त्यांच्या विचारांची ,बुद्धिमत्तेची ओळख आपल्याला होत असते .
अशीच आशयघन असणारी त्यांची एक कविता
आयुष्याच्या वाटेवर
माझ्या वाटेला आलेल्या काट्यांमुळे
प्रवास नाही थांबला
पण काही काटे मात्र पायात
तसेच राहून गेले .
ज्यांचं आज एक कुरूप झालंय
वरवर पाहता या कुरुपामुळे जखमा भारतात
असं वाटत असलं तरी हे कुरूप कधी कधी खूप ठसठसतंय
ती ठसठसणारी वेदना म्हणजे माझी कविता ...
पारलिंगी समूहातील स्रियांच्या दुःखाचा लेखाजोखा म्हणजे हि कविता .सामाजिक दृष्टीकोनातून कोणाच्या उल्लेखातही नसणारी अकरावी दिशा म्हणजे दिशा पिंकी शेख होय .हे नाव त्यांनीच स्वतःसाठी निवडलं .आपल्या वडिलांच्या नाव न लावता आपल्या गुरुचं नाव लावणं हि गुरूंसाठी एक मानवंदनाचं होय .फेसबुक प्रोफाइल मध्ये studied at "या दुनियेन शिकवलं राव "हा hash tag काळजात घर करून जातो .शिवाय "लोकांना आमचे आशीर्वाद हवे असतात पण आम्ही नको असतो " हेही वाक्य आपल्याला अंतर्मुख करून जातं . अशा संवेदन शील मनाच्या कवयित्रीचा संपुर्ण जीवन प्रवास अत्यंत खाच खळग्यांनी भरला आहे ज्याची कल्पना तुम्ही आम्ही सामान्य माणसं करू शकत नाही .परंतु त्यांचा जीवनप्रवास समाजासाठी निश्चितच एक एक प्रेरणा देणारा ,ऊर्जा देणारा आहे .

Comments
Post a Comment