आद्य महिलाशिक्षिका
(क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
शीर्षक -खरी शिल्पकार
माय माऊली सावित्री
शिक्षणाची पुरस्कर्ती
क्रांतिज्योती,ज्ञानज्योती
अशी संयमी धरीत्री
लेक ही सत्यवतीची
बाणा धाडसी,करारी
दिली आयुष्यात तूच
अत्याचारा ललकारी
साही दगड,चिखल
झेप अशी उंच घ्याया
भिडेवाडी काढी शाळा
स्त्रीशिक्षण रची पाया
माय अनाथांची होई
सेवा रूग्णांचीही करी
सावित्रीच्या लेकी आम्ही
अभिमान उंचावरी
जीवनास उद्धारले
तूच खरी शिल्पकार
माता सावित्री माऊली
फेडू कसे उपकार
सौ हेमलता विसपुते
वाशिम
Comments
Post a Comment