🖋️🖋️🖋️
*सौ .रुपाली राहुल जाधव *
*व्यवहारावर बोलु काही *
व्यवहार हा शब्द लिहायला ,वाचायला जितका अवघड तितकाच तो जपायला हि तितकाच अवघड .मुळात तो जोडाक्षर असल्यामुळे बऱ्याच जणांच्या पचनी पडत नाही .आपण आपल्या दैनंदिन जीवनात बरेच व्यवहार करत असतो .त्या पैकी आज आपण सोन्या -चांदीच्या व्यवहारावर बोलू काही .आपल्या भारतात सोने गुंतणुकीला फार महत्व आहे .शास्रात सोने खरेदीचे साडेतीन मुहूर्त ,गुरूपुष्य अमृत योगा च्या खरेदीचे अनन्य साधारण महत्व आहे .*सोन्या -चांदीचा व्यवहार तितक्याच निगुतीनं झाला पाहिजे ,जपला पाहिजे .*
प्रथम ग्राहकाने ठरवायला हवं आपण सोने -चांदी गुंतवणूक म्हणून घेणार ,हौस म्हणून घेणार कि लग्न कार्यासाठी म्हणून घेणार ?
गुंतवणूक म्हणून घ्यायचं तर चोख सोने ,वेढे ,कॅडबरी ,(खाण्याची नाही हं 😀),भिस्कीट स्वरुपात घ्यावी .
परंतु आपणास जेव्हा हौस म्हणून दागिने घ्यायचे असतात ते आपण कोणत्या स्वरूपात घ्यायचे ते ठरवून घ्यावे 24कॅरेट मधील पाटल्या ,बांगड्या ,पोहे हार ,डाई पोत ,चैन ,गोफ इ .इ .
फॅन्सी दागिने हे शक्यतो 22कॅरेट ,हॉल मार्क पासिंग असणारेच घ्यावे .म्हणजे exchange करणे सोपे होते .
सोने काही कोणाच्या घरात ,बागेत ,शेतात तयार होत नाही .सोन्याचे भाव हे आंतराष्ट्रीय पातळी वरून ठरत असतात .
हल्ली मोठया शोरूम मध्ये कॅरेटो मीटर वर सोन्याची शुद्धता तपासता येते .
बाजारपेठे पेक्षा कोणताही व्यापारी रेट तोडून सोने -चांदी चा व्यवहार करत असेल तर ????सुज्ञास जास्त न सांगणे .
कुठलाही दागिना घडविताना एक प्रोसेस असते .त्या प्रोसेस नुसार वेळ द्यावाच लागतो .सोन्या -चांदीचा व्यवहार तितक्याच आत्मीयतेने व्हायला हवा .
शक्यतो जेव्हा शुभ कार्यासाठी म्हणुन सोने खरेदी करतो तेव्हा ती उधारी उसनवारी वर करू नये .
आपल्या बजेटच्या बाहेर उधारीवर खरेदी तुम्ही 3कुटुंबाना फसवत असतात .आणि हि फसवणूक फार मोठी असते त्याची किंमत हि तितकीच मोजावी लागते .
सगळ्या व्यापारात जसे मॉल संस्कृतीचे अतिक्रमण झाले आहे तसेच अतिक्रमण सुवर्ण व्यवसायांत हि झाले आहे .
मोठ्या शोरूम मध्ये कोणतीही घासाघीस न करता रोखीने व्यवहार करून येणारा ग्राहक जेव्हा छोट्या व्यापाऱ्या कडे घासाघीस करतो तेव्हा अक्षरश हसायला येते .
हल्ली ग्रामीण पद्धत आणि शहरी पद्धत असा दोन्ही हिशोब केला जातो .तो हि व्यवस्थित समजून घ्यावा .
चांदी कितीही शुद्ध असली तरी वातावरणाचा ,शरीराच्या तापमानाचा तसेच केमिकल्स चा तिच्या वर परिणाम होऊन ती काळी पडु शकते .हे लक्षात घ्यावे .
तसेच रत्न ,मोती ,हिरे ,माणिक ह्यांच्या बाबतीत खात्रीशीर आणि आपल्या विश्वासातील व्यक्ती कडून च ती खरेदी करावी .
.असं म्हटलं जात कि *मैत्रीत व्यवहार आला कि ती मैत्री तुटते पण आपल्या वर्षानुवर्षांच्या चांगल्या व्यव्हारामुळे अनेक नाती-गोती ,मैत्री वाढवता येते *
तुर्तास इतकेच
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment