विवाह -एक संस्कार की नुसताच सोहळा
आपल्या हिंदू संस्कृतीत विवाह हा सोळा संस्कारांपैकी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा संस्कार आहे .विवाह हा फक्त वधू -वरांचा होत नसतो तर तो दोन परिवाराचा ,विचारांचा ,प्रथांचा ,आपुलकीचा अन प्रेमाचा होत असतो .वरमाळा ,अंतरपाट ,आणि इतर सौभाग्य लेणी ह्या मोजक्या सामग्रीत होणारा विवाह आता इतिहास जमा झाला आहे .
आताचे विवाह सोहळे बघितले कि अंगावर काटा आल्या सारखे होते .काय तो थाट ,काय तो खर्च ,काय ती गर्दी अजिबात ok वाटत नाही .पूर्वी काही भागांपुरती मर्यादित असणारी 5-5 दिवसांचे लग्न विधी आता सगळीकडेच जोर धरू लागले आहेत .आम्हाला हुंडा नको ,मानपान नको च्या नावाखाली मुलांची हौस तेव्हडी पुरविली जाते .speed gun हातात घेतलेले सैनिक आणि कॅमेरे ,ड्रोन घेऊन फिरणारे फोटो ग्राफर ,इव्हेंट मॅनेजर मला सारखेच वाटतात .गदिमांच्या ओळींसारखे *प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट * प्रत्यक्षात त्या जोडप्याला थंडी वाजत असो ऊन लागत असो फोटो मात्र उत्तम आला पाहिजे .हा अट्टाहास नेमका कशासाठी ?आपल्या जीवनातील महत्वाच्या घटनेची साक्ष म्हणून फोटो हवेत कि खास फोटोसाठी लग्न करायचे असा प्रश्न मला फोटो बघून पडतो .
विवाह सोहळ्यात आधीच खूप खर्च होतो पण ह्या नको त्या दिखाव्यासाठी जास्त वेळ ,पैसे,श्रम खर्च होतात .*मान्य आहे हौसेला मोल नसते पण हौस पूर्ण करण्यासाठी मोल द्यावे लागते * लग्नातील जेवणा बाबत बोललं नाही तर तितकंच बर .पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आपण बुफे पद्धत सहज स्वीकारली .पण हि जेवणाची पद्धत फारच ओंगळवाणी वाटते .छान नटून थटून एका हातात प्लेट घेऊन फक्त यात्रेतल्या खाऊ गल्लीत फिरल्यासारखे फिरावे लागते .आपल्या ताटापेक्षा दुसर्याने घेतले हे बघण्यातच वेळ जातो .ह्यात वयस्कर मंडळी ,बच्चे कंपनी उपाशीच राहतात .
कुडकुडणाऱ्या थंडीतही लॉन्स वर केला जाणारा लग्नाचा अट्टाहास आकलनापलीकडचा आहे .असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे .आहेराचे कपडे देण्याघेण्याची प्रथा काही अंशी मागे पडते आहे हे चित्र सुखावह आहे .पण आता सत्काराचे नवीन फॅड सुरू झाले आहे .येणारा प्रत्येक जण आपला वेळ ,पैसे खर्च करून येत असतो तो म्हत्वाचाच असतो .लांबलचक होणारे सत्कार उपस्थितांना कंटाळवाणे वाटतात .ह्या विवाह सोहळ्यांचा उपवर वर -वधू च्या पालकांनी धसकाच घेतला आहे .
*का नाही विवाहाकडे एक संस्कार म्हणून पहिले जात ?* pre -wedding shooting evji pre wedding counsling करणे गरजेचे आहे .कुंडली बरोबर मेडिकल चेकअप तितकेच महत्वाचे मानुन तेही झाले पाहिजे .हुंडा ,मानपान ह्या पेक्षा लग्नात येणारा खर्च दोन्ही पक्षांनी समान करावा .आहेर ,सत्कार ह्यांना फाटा देऊन वधु -वरांच्या हातून काही समाजोपयोगी उपक्रम राबविता येईल का ते पाहावे .दोघांना एखादी policy एखादी sip गिफ्ट द्यावी .मोजक्याच अन्न पदार्थांची सुग्रास जेवणाची पंगत असावी .येणारा प्रत्येक जण तृप्त मनाने जेवण करून जायला हवा .लग्न मुहूर्तावर म्हणण्यापेक्षा वेळेतच लागेल ह्या साठी सर्वजण आग्रही असावे .ब्युटीपार्लर ,बँड ,डिजे आपल्यासाठी असावे त्यांच्या साठी आपण लग्न करत नाही .तसा हा खूप मोठा आणि व्यापक विषय आहे .बोलू तितके थोडे पण इथेच थांबते .आजच्या पिढीला असे वाटेल आमची हौस ह्यांना सहन होत नाही पण अशा विवाह सोहळ्याचा एक दिवसाच्या खर्चात कित्येक संसार सुरळीत होतील .जाता जाता एकच सांगते ,
*नकोच नुसता दिमाखदार सोहळा *
*विवाह एक संस्कार असावा *
*आपल्या संस्कृतीचा मान *
*आपल्या कडूनच राखला जावा *
-सौ .रुपाली जाधव
बागलाण
Comments
Post a Comment