ठिकाण -सत्यायन नगरी (सटाणा )
कार्यक्रम -संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज रथोत्सव
मार्गशीर्षाच्या सफला एकादशीच्या पहाटेच्या साक्षीने भर थंडीत देवमलेदारांच्या अभिशेकाला सुरुवात झाली .प्रशासन ,
विश्वस्त ,भाविक भक्त,अनेक सामाजिक संस्था ,विविध मंडळे यात्रौस्तवासाठी सज्ज झाले .
देवा ब्राम्हणांच्या मंत्रघोषात अभिषेक संपन्न झाला .दुपारी 4 वाजता रथयात्रेला सुरुवात झाली .
शहरातील चार बॅंडपथक ,दोन ढोल पथक ,अक्कलकुवा येथील आदिवासी नृत्यकलाकार ,टिपरी नृत्य सादर करणारे ,मुबंई येथील भांगडा नृत्य करणारे कलाकार ,दोन शाळांचे लेझीम पथक ,पुरुष आणि महिला भजनी मंडळ तसेच श्री यशवंतराव महाराजांचा जिवंत देखावा आणि मुख्य आक्षण म्हणजे महाराजांचा रथ सुसज्ज अशी रथ यात्रा बघण्याचं भाग्य आम्हा बागलानवासीयांना मिळालं .
खास रथ मिरवणुकीसाठी येवल्याचे भक्त मंडळ ,नाशिकचे भक्त मंडळ ,सायकलिस्ट तसेच संपूर्ण तालुक्यातुन भाविक दाखल होतात .खास महाराजांवर रचलेली गाणी बॅन्डवर वाजवली जातात .आदिवासी नृत्याला एक वेगळाच गावरान बाज असतो एक नाद असते ती मनाला मोहित करून जाते .त्यांची वेशभूषा आकर्षक असते .टिपरी नृत्यही तसेच आकर्षक होते .लेझीम पथकांनीही आपापली सादरीकरण सुंदर केली .
भजनी मंडळांनी भगवंतांची सुंदर भजन गायली .
रथ मार्गात विविध मंडळांनी स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या .जागोजागी सुवासिनींनी भगवंतांच्या रौप्य मूर्तीचे औक्षण केले .खडीसाखरआणि पेढ्याचा प्रसाद सर्वाना वाटण्यात आला.
रथ मिरवणूक चालू असतांना वातावरणात एक वेगळंच भारावलेलं पण वाटत होत .आजच्या दिवशी भगवंतांच रूप काही वेगळंच भासत होत .जोतो त्या रुपाला आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होता .खरोखर पंचक्रोशीतून हा रथोस्तव बघायला जनसामान्य का गर्दी करतात हे गूढ समजलं .
एका शासकीय अधिकाऱ्याच्या पुण्यतिथी निमित्त पंधरा दिवसांची यात्रा भरविणारे भारतातील बागलाण हे एकमेव ठिकाण आहे .रथ मिरवणुकीसाठी वेगवेगळ्या मंडळांनी भक्त गणांसाठी पाणी ,दुध ,फराळाची व्यवस्था केलेली होती .परगावातून येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षणीय होती .तितकाच सहभाग गावकऱ्यांनीही दाखवला तर रथ मिरवणुकीला भव्यता लाभेल असे मला वाटते .पंढरपूरच्या वारीप्रमाणे तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला भगिनी पारंपरिक महाराष्ट्रयीन वेशात बंधु वर्ग ,सनई ,चौघडा ,तुतारी ,सर्व लहान थोरांना सामावुन घेणारी रथ मिरवणूक मी कायम स्वप्नात बघते .तोही दिवस येईल कधीतरी .
बँडच्या चालीवर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई बघितली कि कितीही नाही म्हटलं तरी मन खिन्न होऊन जात .पुण्य तिथी निमित्त होणारी रथ यात्रा आहे हा विसरच जणु त्यांना पडलाय असे वाटते.त्यापेक्षा यशवंतराव महाराजांचा एक जरी गुण आपण अंगी बाणला तरं बागलाण च भविष्य काहीतरी उज्जवल नक्कीच असेल .बँड च्या आवाजावर प्रश्नचिन्हच आहे ध्वनी प्रदूषण काय असते ?त्याचा परिणाम काय होतो ?हे अनुभवण्यासाठी रथ यात्रा प्रत्येकाने अनुभवावीच . हे माझं वयक्तिक मत आहे शेवटी लोकशाही आहे ज्याच्या त्याचा आनंद व्यक्त करायची पध्दत भिन्न भिन्न असू शकते .व्यक्तिगत दोषारोपाचा कोणताही हेतु नाही हे लेख वाचणाऱ्या सर्वानी लक्षात घ्यावे हि नम्र विंनती .
तर असे हे भावंताचे आगळे वेगळे रूप डोळ्यात साठवुन रात्री बारा वाजता श्री महालक्ष्मी मंदिरासमोर भगवंतांची हार श्रीफळ देऊन पंचोपचार पूजा आणि आरती करण्यात आली .फटाक्यांच्या आतिष बाजीत भगवंतांना स्वमंदिरी निरोप देण्यात आला .अशाप्रकारे यथासांग रथ मिरवणुकीची समाप्ती होते .भगवंत पुढील पंधरा दिवसांच्या यात्रौस्तवासाठी मायबाप भक्तांसाठी सज्ज होतो .
धन्यवाद .
लेखिका -सौ .रुपाली राहुल जाधव
Comments
Post a Comment