मायबाप सरकार | एक विनंती वजा पत्र | Letter from Small business man to government | Dil ki baat | World wide condition | Covid19
एक विनंती वजा पत्र
22मार्च ला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी लॉक डाऊन जाहीर केला .त्याआधीच 20तारखेला आपल्या महाराष्र्टात लोकडाऊन जाहीर झाला .
जिवाच्या भीतीने म्हणा का आपल्या आदेशाचे पालन करायचे म्हणून आम्ही व्यापाऱ्यांनी उस्फुर्त आमचा व्यवहार बंद केला .आज जवळ जवळ दीड ते दोन महिने आमचा व्यापार पूर्ण ठप्प आहे .
ह्या कालावधीत आमचे कोणतेही बिल माफ झाले नाही ,कोणतेही हप्ते भरणे आम्हाला चुकले नाही ,कि सरकार कडून आमच्या साठी काही जाहीर झाले नाही उलट पक्षी आमच्या कडे कामाला असणाऱ्या कामगारांना भर पगारी सुट्टी दयायला लावली तीही आम्ही स्वखुषीनेच दिली .
आम्ही कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या वॅरियर्स ला मनापासून सलाम करतो ,डाँ.,नर्स ,मेडिकल शासन ,प्रशासन ,किराणा ,दूध विक्रेते ,बँक कर्मचारी ,भाजी विक्रेते आणि आपला बळी राजा ह्या सर्वांचे मनापासून आभार मानतो .त्यांच्या मुळेच आम्ही आजवर सुरक्षित आहोत हे हि मानतो .
सर्व काही चांगले चालू आहे असे मनाला वाटत होते .
पण ह्या सर्व बाबतीत एक गोष्ट मनाला खटकत होती .
परप्रांतीयांचा इतका मोठा लोंढा आपल्या गावी परतत आहे .त्यांची गर्दी ,भाजीपाला ,मसाल्याचे सामान ,किराणा सामान घायला तोबा गर्दी ,मद्य विक्री पोलीस बंदोबस्तात चालू ,रेशन च्या दुकानात गर्दी परदेशात अडकलेल्याना स्वदेशी आणायची गर्दी ह्या सर्व गर्दी मुळे कोरोना होत नाही कारण तिला परवानगी आहे .
पण जो आपल्या अर्थ व्यवस्थतेतील एक महत्वाचा कणा आहे छोटा व्यापारी ,लघु उद्योजक सोनार ,कापड दुकानदार ,स्टेशनरी ,कटलरी ,भांडे ,चप्पल व्यावसायिक ज्याच्या दुकानात मोठ्या मुश्किलीने दिवसभर 20/25लोक येतात त्याच्या दुकानांमुळे कोरोना वाढेल हा कोणता न्याय ,
आम्हाला कर्जमाफी नको ,आम्ही नियमित कर भरणार ,कायम शासनाचे मान मोडून सर्व नियम पाळणार मग आमच्याच बाबतीत हे धोरण का ?
माझी सरकारला एक विनंती आहे 17मे नंतर कोणतीही जादूची कांडी फिरणार नाही ,आपल्या कडे कोरोनाची कोणतीही लस नाही ,इतर ठोस उपाययोजना नाही मग अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा कणा असणाऱ्या व्यापारी वर्गाकडे इतके दुर्लक्ष का ?
आपण एक नियमावली घालून देऊन आमच्या दुकानांना उघडण्याची परवानगी द्यावी हि नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत एक मध्यम व्यापारी
-सौ .रुपाली जाधव
बागलाण
Copyright © Gold Poem

Reality. Government has to take decision for small businesses.
ReplyDeleteप्रत्येकाला व्यवसाय करुन सर्वाना समान न्याय दिला पाहिजे सरकारला दारुची दुकाने महत्त्वाचे वाटतात
ReplyDelete