शेगावीचा राणा गजानन - गुरु गजानन - मराठी कविता - gajanan maharaj (shegav ) marathi kavita - gold poem
शेगावीचा राणा गजानन
शीर्षक-गुरु गजानन
शेगावीचा राणा गजानना
मी पामर काय वर्णु तुझी गाथा
उद्वरीले तू सकलजन
चरणी ठेविते हा माथा
गणगण गणात बोते
हा सिद्धमंत्र देई आधार
नाम जपता तूझे
संकटे घेई माघार
बहु पुण्यवान मी
लाभले गजानन गुरु
भवदुःखातून तारी
गजाननाचे ध्यान सुरु
गजानन विजय ग्रंथाचे
पारायण नित्य घडो
वाचून होई मन प्रसन्न
हा देह तूझ्या पायी पडो
सौ हेमलता विसपुत
वाशिम

खूपच सुंदर कविता आहे. मला पण blog लिहायचे आहेत . पण फार कॉन्फयुज्ड आहे.
ReplyDelete