मी एक सुवर्णव्यावसायिक | I am Goldsmith | Autobiographie of Goldsmith | Covid 19 Dil ki baat | Corona Virus Mn ki baat
मी एक सुवर्णव्यावसायिक
कोरोनासारख्या जागतिक महामारीने अवघे जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे .काल परवापर्यंत आम्ही समजत होतो कि मानवाच्या जन्मा पासून मृत्यू पर्यंत आम्हा सुवर्ण कारांचे मोठे योगदान असते .एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे अनन्य साधारण महत्व आहे .पण ह्या महामारीने दाखवून दिले कि "जगण्यासाठी फक्त आणि फक्त जगणंच महत्वाचं असत "तर असो आमच्या व्यवसायवर येणाऱ्या अनेक संकटांपैकी हे एक आहे पण ह्याच स्वरूप वेगळं आहे .त्याच्याशी लढायला आपल्याकडे साधन नाहीत .
शासनाचेही अजब धोरण लक्षात येत नाही सोशल डिस्टंस्टिंग चे नियम नेमके कोणासाठी आहेत .मूठभर आमच्या सारखे कायद्यात राहणारे लोक पाळतात बाकीचे फिरण्याचा परवाना भेटल्यासारखे फिरत सुटतात .एकीकडे 50व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न लावण्याची परवानगी आणि दुसरीकडे लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टीना बंदी .त्या मुळे काय करावे आणि काय करू नये ह्या संभ्रमात सर्व व्यावसायिक आहेत .तो करू शकतो मग मी का नाही ? हा प्रश्न सर्वांचं छळतो आहे .
आपल्या भारतातील अनेक युवा वर्ग बेरोजगारिने ग्रासला आहे तर अपुऱ्या सुविधांमुळे जनसामान्य पछाडला आहे .ज्या दिवशी हि दरी मिटेल त्या दिवशी हि जीवघेणी स्पर्धाही संपेल .
पण तूर्तास फक्त आणि फक्त घरीच राहून ह्या महामारी विरुद्ध एक अखंड लढा द्यायचा आहे .आपल्या भावी पिढीला संयम शिकवायचा आहे .आजवर त्यांनी मागितलं ते आपण पुरवलं किव्हा मागायच्या आधीच पुरवलं .हि परिस्थिती बदलायला हवी .सोशल डिस्टंटिग ,स्वछता ,घरचे खाणे ,आरोग्य ,योगा ,मास्क ,सॅनिटायझर वापरणे ह्या गोष्टी जीवनावश्यक होतील हे आपण समजून त्यांनाही समजवायला हवे .
-सौ .रुपाली जाधव

छान वाहिनी आणि राहुल दादा 👍👌🏻
ReplyDelete