जागतिक पर्यावरण दिन
विषय -माती
ओल्या मातीचा गंध
कुठे हरवला कोण जाणे ?
आकाशातील काळे ढग
कुठे दडले कोण जाणे ?
प्रत्येक ठिकाणच्या
मातीचा रंग वेगळा
तिच्यातुन निघणारा
गंध वेगळा
पावसाची चातकापेक्षाही
जास्त वाट पाहते ती माती
तिच्यातुनच मिळते माझ्या
बळीराजाच्या जीवनाला गती
मातीच्या रूपावर कोणी जाऊ नका
मातीचा रंग जरी काळा असतो
तिच्यातुन जन्म घेणारा प्रत्येक
जीव सप्तरंगी भासतो
जन्माला आलेल्या प्रत्येक
जिवाने मातीच ऋण फेडायला हवं
वृक्षारोपण करून तिच्या उपकारातुन
थोडं तरी उतराई व्हायला हवं
आजच जपला जर मातीचा गंध
तर भावी पिढीला भेटेल सुगंध
नाही तर ह्या क्राँकिटच्या जंगलात
होईल ती फारच संधिग्ध
-सौ .रुपाली राहुल जाधव
बागलाण
Copyright © Gold Poem

Comments
Post a Comment