शीर्षक-लढाऊ ,परिचारिका
आला आजचा हा दिवस
साजरा होतो सर्वत्र
परिचारिका दिन
रुग्णांच्या सेवेत महत्वाचे
त्यांचे योगदान
करीत असतात अहोरात्र
त्या सेवादान
लपवुनी आपल्या सर्व भावना
करीत असतात आपले
कर्तव्य छान
डाँ.च्या सेवेइतकाच
त्यांनाही असतो मान
असो कोणत्याही वयाचा रुग्ण
तरी सेवा करतील त्यास समजुनी
लहान
कोरोनाच्या लढाईत भूमिका
त्यांची महत्वाची
काही लोक थुकती तोंडावरती तर
काही काही पाया पडुनी देती
त्यांना मान
आपल्या कुटुंबापासून राहून दूर
इमाने इतबारे आपले सेवाव्रत जोपासून
वाढवी देशाची शान
अशा सर्व परिचारिकांपुढे
वंदनासाठी झुकती आमची
मान 🎩🎩🎩
-सौ .रुपाली जाधव
बागलाण

Comments
Post a Comment